गरज ९०० कोटींची मिळाले २० कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2016 12:07 AM2016-02-17T00:07:31+5:302016-02-17T00:31:14+5:30
गजेंद्र देशमुख , जालना लघू पाटबंधारे विभागातंर्गत जिल्ह्यात ४३ प्रकल्प निधी तसेच भूसंपादनाच्या कारणावरून रखडले आहेत. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी
गजेंद्र देशमुख , जालना
लघू पाटबंधारे विभागातंर्गत जिल्ह्यात ४३ प्रकल्प निधी तसेच भूसंपादनाच्या कारणावरून रखडले आहेत. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे ९०० कोटींची गरज आहे. प्रत्यक्षात २० कोटींचा निधीच उपलब्ध आहे.
जिल्ह्यात ७ मध्यम व ५७ लघू प्रकल्प आहे. यासोबतच इतर ४३ नवीन प्रकल्पांचे काम सुरू आहे. यापैकी ९ प्रकल्पांचे कामे कसेबसे सुरू आहेत. मात्र ही कामे करतानाही निधी तसेच इतर अडचणी येत असल्याने प्रकल्प पूर्ण सिंचन कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे. अगोदरच जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मध्यम प्रकल्प वगळता मोठे धरण नाही. यामुळे जुन्या प्रकल्पांवर सिंचनाची भिस्त आहे. सध्यस्थितीत बाणेगाव - २४.४८, पळसखेडा २१.३१, बरबडा- २००. ६६, हातवन २७८.८१, पाटोदा ११७.५०, उस्वद ३.८४, अंबा - १.३४, वाघाळा- २.८९, पाथरवाला ६१.५६ कोटी रूपये या प्रकल्पांची किंमत आहे. एकूण किंमत ७१२ कोटी रूपये होत आहे.