मुंबईची नेरळकर अकॅडमीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:55 PM2018-01-28T23:55:26+5:302018-01-28T23:56:34+5:30

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरवारे क्रीडा संकुलावर सुरूअसलेल्या राज्यस्तरीय ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत मुंबई सहारा संघाने नेरळकर अकॅडमीवर मात केली. सहारा मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ७ बाद १५३ धावा ठोकल्या.त्यांच्याकडून राहुल देसाईने २ षटकार व एका चौकारासह ३५, संजय मिश्राने एक षटकार व ४ चौकारांसह ३२ व प्रीतम पाटीलने २२ धावा केल्या.

Neeralkar Academy beat Mumbai | मुंबईची नेरळकर अकॅडमीवर मात

मुंबईची नेरळकर अकॅडमीवर मात

googlenewsNext

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गरवारे क्रीडा संकुलावर सुरूअसलेल्या राज्यस्तरीय ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत मुंबई सहारा संघाने नेरळकर अकॅडमीवर मात केली. सहारा मुंबई संघाने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ७ बाद १५३ धावा ठोकल्या.त्यांच्याकडून राहुल देसाईने २ षटकार व एका चौकारासह ३५, संजय मिश्राने एक षटकार व ४ चौकारांसह ३२ व प्रीतम पाटीलने २२ धावा केल्या. नेरळकर अकॅडमीकडून उदय पांडेने १३ धावांत २ गडी बाद केले. आनंद ठेंगे, आदित्य नाईक, अमोल खरात, मझहर पठाण व पंकज फलके यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात नेरळकर अकॅडमी संघ १९.५ षटकांत १२४ धावांत सर्वबाद झाले. त्यांच्याकडून उदय पांडेने २३ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ३२ धावा केल्या. सचिन लव्हेरा याने १८ चेंडूंत ३ षटकारांसह २५, मनीष कर्वा याने १८ धावा केल्या. सहारा मुंबईकडून कौस्तुभ भाटेने १२ धावांत ३ गडी बाद केले. महाराष्ट्राचा रणजीपटू अक्षय दरेकर, राहुल देसाई व मानसिंग निगडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
दुसºया सामन्यात पुणे अ‍ॅडव्होकेट संघाने ग्लास पॉलिश इंडियाविरुद्ध १२७ धावा केल्या. त्यांच्याकडून सुधाकर पाटीलने २५ व ऋषिकेश सोनवणे याने २२ धावा केल्या. तुषार म्हात्रेने १६ धावांत ४ गडी बाद केले. सागर मुळेने ३ व सचिन तवारे याने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात ग्लास पॉलिश इंडिया संघाने विजयी लक्ष्य ११.३ षटकांत ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून रोहित राणे याने २३ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ५३, कुणाल नग याने नाबाद ३३ व ओमकार गौरवने २१ धावा केल्या. पुणे संघाकडून नासेर मोमीन व सुशांत बार्शीकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

Web Title: Neeralkar Academy beat Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.