शिवनेरी कॉलनीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:04 AM2021-02-13T04:04:26+5:302021-02-13T04:04:26+5:30
जोगेश्वरीत अभिवादन कार्यक्रम वाळूज महानगर : आनंद बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जोगेश्वरीत रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री चौकातून मिरवणूक ...
जोगेश्वरीत अभिवादन कार्यक्रम
वाळूज महानगर : आनंद बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जोगेश्वरीत रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री चौकातून मिरवणूक काढण्यात आली. येथील बुद्धविहारात आयोजित कार्यक्रात ध्वजारोहण, अभिवादन व भोजनदान आदी कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष राहुल रणवीर, देवानंद सावंत, मीना सोनवणे, सुवर्णा पंडित, माया तांगडे आदींची उपस्थिती होती.
---------------------
वडगाव स्मशानभूमीची दुरवस्था
वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी येथील सार्वजनिक स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. या स्मशानभूूमीलगत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली असून, मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढला आहे. अस्वच्छतेमुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
---------------------------
बजाजनगरात अखंड हरिनाम सप्ताह
वाळूज महानगर : बजाजनगरातील श्री साईबाबा मंदिरात सोमवारपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. साई मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या मंदिरात दररोज विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमात सुधाकर जोशी यांचे साईचरित्र पारायण होणार आहे. सोमवारी (दि.२२) सकाळी पालखी मिरवणूक महायज्ञ, ह.भ.प. रामेश्वर महाराज शिंदे यांचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे.
----------------------
लांझी टी-पाॅइंटला अतिक्रमणांचा विळखा
वाळूज महानगर : वाळूजच्या लांझी टी-पाॅइंटला अतिक्रमणांचा विळखा पडल्याने याठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत आहे. याठिकाणी विविध व्यावसायिकांनी अतिक्रमणे थाटल्याने रस्ता अरुंद झाला असून, ये-जा करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या अतिक्रमणांकडे पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.