शनिवारी उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रेचे आयोजन

By | Published: November 26, 2020 04:12 AM2020-11-26T04:12:41+5:302020-11-26T04:12:41+5:30

क्रांतीचौक येथून शनिवारी सकाळी ११ वाजता या यात्रेला प्रारंभ होईल. ही यात्रा कायगाव- कोपर्डी (जिल्हा अहमदनगर) मार्गे २९ ...

Neglected Maratha Mashal Jagruti Yatra organized on Saturday | शनिवारी उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रेचे आयोजन

शनिवारी उपेक्षित मराठा मशाल जागृती यात्रेचे आयोजन

googlenewsNext

क्रांतीचौक येथून शनिवारी सकाळी ११ वाजता या यात्रेला प्रारंभ होईल. ही यात्रा कायगाव- कोपर्डी (जिल्हा अहमदनगर) मार्गे २९ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी असलेल्या वढू बुद्रुक येथे अभिवादन करण्यासाठी पोहोचेल. शिवनेरी येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी शिवनेरी ते आझाद मैदान पदयात्रेस सुरुवात होईल. कोरोनामुळे पदयात्रेत केवळ ५० व्यक्तींचा सहभाग असेल, असे केरे यांनी सांगितले. ७ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे यात्रा दाखल होईल. उपेक्षित मराठ्याच्या प्रलंबित मागण्या मान्य करून समाजाला न्याय आणि हक्क मिळवून द्यावा, याकरिता मुख्यमंत्र्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देणार असल्याचे केरे यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेसाठी किरण काळे पाटील, राहुल पाटील, मनोज मुरदारे, मोती वाघ, कृष्णा उघडे, नरहरी उबाळे आदी उपस्थित होते.

Web Title: Neglected Maratha Mashal Jagruti Yatra organized on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.