वनविभागाच्या दुर्लक्षाने बेसुमार वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:52 AM2017-11-12T00:52:02+5:302017-11-12T00:52:06+5:30
वन विभागाच्या दुर्लक्षामुळे माहूर तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. कालच तालुक्यातील माहूर बीटमधील टाकळी मुरली शिवारात अवैधरित्या गैरी लाकडाची वाहतूक करणाºया ट्रकला वनविभागाने सापळा रचून पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर : वन विभागाच्या दुर्लक्षामुळे माहूर तालुक्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. कालच तालुक्यातील माहूर बीटमधील टाकळी मुरली शिवारात अवैधरित्या गैरी लाकडाची वाहतूक करणाºया ट्रकला वनविभागाने सापळा रचून पकडले. हा अवैध वृक्षतोडीचा सर्वात मोठा पुरावा आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी हे प्रभारी असल्याने ते उंटावरुन शेळ्या हाकत असून वनपाल व कर्मचाºयांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष माहूरच्या जंगलाचे वाळवंट करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
वनक्षेत्र वाढविण्यासाठीची शासनाची झाडे लावा, झाडे जगवा ही योजना हवेतच विरली आहे. बेसुमार वृक्षतोडीने पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. जिल्ह्यातील एकूण वनव्याप्त क्षेत्रापैकी निम्म्यांहून अधिक क्षेत्र माहूर, किनवट तालुक्यात आहे.
माहूुर तालुका हा सह्याद्री पर्वताच्या रागांत मौल्यवान सागवान वृक्षाच्या घनंदाट जगंलानी व्यापला असून तालुक्यात एकूण १३हजार ६१७.९८१ हेक्टरवर वनक्षेत्र असून वनपरिमंडळ ५ आहेत.
तालुक्याचे एकूण भोगोलिक क्षेत्र ५१ हजार ७७०.८३ हेक्टर असून त्यापैकी जंगलाखालील क्षेत्र १३ हजार ६१७.९८१ हेक्टरवर सह्याद्री पर्वताच्या घनदाट जंगलभागात मौल्यवान सागवानी वृक्षानी व्यापलेला आहे. तालुक्यातील शेतकºयांनी विना परवाना बांधावरील, माळरानावरील झाडांची विक्री करण्याचा सपाटा लावला आहे.
अवैध वृक्षतोडीवर सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने वातावरणाचा समतोल राहिला नाही. उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे. वातावरण दूषित होऊ लागले आहे. वातावरणात समतोल रहावा म्हणून शासन विविध उपाययोजना करते. १ जुलै रोजी शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमाची जिल्ह्यात माहुरातून पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले गेले. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश गावोगावी पोहोचविण्यात आला, परंतु शासनाची झाडे लागवडीची नोंद कागदावरच आहे. शतकोटी वृक्ष लागवड योजनेत वृक्षलागवड करायची अन् दुसºया बाजूला अवाजवी वृक्षतोडीवर प्रतिबंध घालायचा नाही़ यामुळे जंगलाना वाळवंटाचे स्वरुप प्राप्त होत आहे.
माहूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. नरोड यांना विविध कामात भ्रष्टाचार केल्याचा कारणावरुन मागील तीन-चार महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले होते.