भल्या मोठ्या क्षेत्रातही नगण्य उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:55 PM2017-11-25T23:55:17+5:302017-11-25T23:55:28+5:30
नेहमीच चर्चेत असलेल्या कृषी विभागाच्या बिजाराममध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने कमी उत्पन्न दाखविले जाते. या बीजगुणन केंद्रावर शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करते. सर्व सुविधा असतानाही उत्पन्नात घट का व्हावी? याचा अजून तरी ताळमेळ लागलेला नाही. प्रत्येक वेळी विचारणा केली असता कमी उत्पन्न झाल्याचे तेवढे मात्र संबंधित यंत्रणा सांगते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नेहमीच चर्चेत असलेल्या कृषी विभागाच्या बिजाराममध्ये दरवर्षी कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने कमी उत्पन्न दाखविले जाते. या बीजगुणन केंद्रावर शासन लाखो रुपयांचा निधी खर्च करते. सर्व सुविधा असतानाही उत्पन्नात घट का व्हावी? याचा अजून तरी ताळमेळ लागलेला नाही. प्रत्येक वेळी विचारणा केली असता कमी उत्पन्न झाल्याचे तेवढे मात्र संबंधित यंत्रणा सांगते.
हिंगोलीत बिजारामचे सर्वाधिक क्षेत्र आहे. यामध्ये एकूण पाच तालुका बीज गुणन केंद्र आहेत. यामध्ये बासंबा, औंढा नागनाथ तालुक्यात गोळेगाव, वसमत, कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर या गावांचा समावेश आहे. एकट्या बासंबा येथे ३५.५० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ ३ हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य नाही. उर्वरित जमिनीवर सोयाबीन, ज्वारी, मूग, उडिदाची पेरणी केली होती. यावर लाखो रुपयाचा खर्चही करण्यात आला होता. तर सोयाबीन ४० क्विंटलच झाल्याचे सांगण्यात आले. इतर पिकांच्या उत्पन्नाचा तर अजून ताळमेळच नाही. म्हणे, याहीवर्षी अल्प पर्जन्यमानामुळेच उत्पन्न कमी झाल्याची ओरड या विभागातून होत आहे. विशेष म्हणजे याच भागात असलेल्या शेतकºयांना सोयाबीन पिकाचा एकरी पाच ते सहा पोत्यांचा उतारा आलेला आहे. मात्र या यंत्रणेकडे सर्व सुविधासह आधुनिक यंत्रही उपलब्ध असली तरी नेहमीच निसर्गाचे कारण सांगत उत्पन्न कामी सांगण्याचा फंडा लावला आहे. सर्व सुविधा असल्याने तरी या क्षेत्रात उतारा चांगला येणे गरजेचा आहे. निदान शासनाचा भांडवली खर्च तरी भरुन निघण्यास मदत होईल. शिवाय सुरक्षारक्षकही क्षेत्रात उपलब्ध नसल्याने क्षेत्रातील ज्वारी किंवा आदी पिकांची गुरांकडून नुकसान अथवा चोरी केली असली तरीही अद्याप कोणतेच टोकाचे पाऊल न उचलता पायबंद घातलेला नाही. त्याचा फायदा घेऊन बिजाराममधील पिकांचे आतोनात नुकसान केले जात आहे. त्यातच नियुक्ती केलेले सुरक्षारक्षकही कधीतरी या भागात फेरफटका मारत असल्याने त्यांचाही कोणावर वचक राहिलेला नाही. ही स्थिती केवळ बासंबा परिसरातीच नव्हे, तर पाचही ठिकाणच्या केंद्रातील वास्तव चित्र आहे. त्यामुळे परिसरात उत्पन्नाची चांगलीच चर्चा रंगत आहे.