‘नेट-सेट’धारकांना ‘पेट’मधून सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:06 AM2021-01-08T04:06:01+5:302021-01-08T04:06:01+5:30
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पेट’ची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी १ ते ११ जानेवारीदरम्यान ऑनलाइन नोंदणी करण्यात ...
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पेट’ची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी १ ते ११ जानेवारीदरम्यान ऑनलाइन नोंदणी करण्यात येईल, तर ३० रोजी पेटचा पहिला पेपर होईल. दोन्ही पेपरचा निकाल २८ फेब्रुवारी रोजी लागेल. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी मार्चमध्ये होईल, तर एप्रिल महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या बैठका घेण्यात येतील. ४२ विषयांत पेट होणार असून, विषयनिहाय रिक्त जागा व गाइडची संख्याही प्रकाशित करण्यात येणार आहे, असे कुलगुरू म्हणाले.
पेटचा दुसरा टप्पा १ मार्च ते एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या टप्प्यात पेट उत्तीर्ण झालेले, तसेच पेटमधून सूट मिळालेले नोंदणी करण्यासाठी पात्र असतील. १ ते १५ मार्चदरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येईल, तर २० मार्चपर्यंत विद्यापीठात हार्ड कॉपी जमा करता येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी कळविले.