नवे संकट ! औरंगाबादमध्ये १० दिवसांत 'सारी'च्या ११ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 04:47 PM2020-04-09T16:47:21+5:302020-04-09T16:49:32+5:30

कोरोनाबाधित मयत बँक अधिकारीही होते सारीचे रुग्ण 

New crisis! Aurangabad: 11 patients of 'Sari' die in 10 days | नवे संकट ! औरंगाबादमध्ये १० दिवसांत 'सारी'च्या ११ रुग्णांचा मृत्यू

नवे संकट ! औरंगाबादमध्ये १० दिवसांत 'सारी'च्या ११ रुग्णांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसारी आणि कोरोनाची लक्षणे सारखीच आहेतकोरोनामुळे मृत बँक अधिकाऱ्याला होता सारी

औरंगाबाद : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त होताना गेल्या १० दिवसांत 'सारी'च्या (सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटीचे नोडल ऑफिसर डॉ. मोहन डोईबळे यांनी दिली. या ११ रुग्णांत कोरोनाबाधित मयत बँक अधिकार्याचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

औरंगाबादेत चिंतेचा विषय ठरत असतानाच ‘सारी’चे संकटही अधिक घट्ट झाले आहे़ या आजाराने २९ मार्च ते ७ एप्रिल या १० दिवसात ११ जणांचे बळी घेतले. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते. यात १० जनांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह होता. तर एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. हे पॉझिटिव्ह रुग्ण म्हणजे कोरोना बाधित मयत बँक अधिकारी, अशी माहिती डॉ. डोईबळे यांनी दिली.

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच याच आजारासारखी लक्षणे असलेल्या सारीचा शिरकाव औरंगाबादेत झाला़ आहे कोरोना व्हायरसप्रमाणे सारी या आजाराचीही सर्दी, खोकला ताप हीच लक्षणे आहेत़ शहरात मंगळावरपर्यंत सारीचे ९७ आढळले होते. त्यात ८३ जनांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. घाटीत सध्या २३ रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) सारीच्या प्रत्येक सारीच्या रुग्णाची कोरोना तपासणी केली जात आहे. सद्यस्थितीत सारीच्या २३ रूग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) उपचार सुरू आहे़

सारीची लक्षणे

सारी आणि कोरोना या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच आहेत. सारीच्या रुग्णाला एकदम सर्दी, ताप येतो. तापाचे प्रमाण जास्त असते, शिवाय अशक्तपणा खूप येतो. निमोनिया, श्वसन दाह, छातीत दुखणे, रक्त शुद्धीकरण क्षमता कमी होणे आदी लक्षणेही आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्याशिवाय या रुग्णाला पर्याय नसतो. दोन ते तीन मृत्यू होण्याचा धोका असतो.

Web Title: New crisis! Aurangabad: 11 patients of 'Sari' die in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.