नव्या औषधींमुळे मूत्रपिंडरोपण यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले
By Admin | Published: September 24, 2016 12:23 AM2016-09-24T00:23:57+5:302016-09-24T00:30:17+5:30
औरंगाबाद : कमी खर्चात, अधिक परिणामकारक व सुरक्षितपणे करता येईल, यावर तज्ज्ञांनी चर्चा केली.
औरंगाबाद : किडनीतील खड्यांवर लिथोट्रिप्सी, यूआरएस, लेझर अशा विविध प्रकारे उपचार करता येतात. यापैकी कोणत्याही प्रकारचा उपचार कमीत कमी खर्चात, अधिक परिणामकारक व सुरक्षितपणे करता येईल, यावर तज्ज्ञांनी चर्चा केली. नवीन प्रकारच्या औषधींमुळे मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
औरंगाबाद युरॉलॉजी असोसिएशनच्या वतीने आयोजित मूत्ररोग शल्यचिकित्सकांच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी विविध विषयांवर चर्चासत्र पार पडले. विविध उपचार पद्धतींवर आयोजित चर्चासत्रात पुणे येथील डॉ. जयदीप दाते, जामनगर येथील डॉ. उल्हास साठे, सोलापूर येथील डॉ. विजय राघोजी, मुंबई येथील डॉ. लालमलानी, अहमदाबाद येथील डॉ. कंदर पारीख यांनी मार्गदर्शन केले. १५ ते २० टक्के लोकांना मूतखड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. परंतु अत्याधुनिक दुर्बिण आणि लेझर तंत्रज्ञानामुळे मूतखडा काढणे सोपे झाले आहे. दुर्बिणींचा आकार कमी झाल्यामुळे त्याचा मोठा फायदा होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मूत्रपिंडरोपणावरील चर्चासत्रात डॉ. राजापूरकर नडियाद, डॉ. ओझा, डॉ. ओसवा, डॉ. गणपुले यांचा सहभाग होता. किडनी, मूत्राशय, प्रोस्टेड ग्रंथींच्या कर्करोगावर डॉ. मकरंद कोचीकर यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत विविध विषयांवर शोधनिबंधही सादर करण्यात आले. त्यातून नवीन संशोधनाचे आदान-प्रदान करण्यात आले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ.पुरुषोत्तम दरख, डॉ.अभय महाजन, डॉ. देवदत्त पळणीटकर, डॉ. विजय दहीफळे व औरंगाबाद युरॉलॉजी असोसिएशनचे सदस्य प्रयत्न करीत आहेत.