काँग्रेसची नवी कार्यकारिणी लवकरच

By Admin | Published: April 24, 2016 11:29 PM2016-04-24T23:29:57+5:302016-04-25T00:45:24+5:30

औरंगाबाद : येत्या महिनाभरात औरंगाबाद शहर काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी दिली.

The new executive committee of the Congress will be soon soon | काँग्रेसची नवी कार्यकारिणी लवकरच

काँग्रेसची नवी कार्यकारिणी लवकरच

googlenewsNext

औरंगाबाद : येत्या महिनाभरात औरंगाबाद शहर काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी दिली.
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन काँग्रेस मजबूत करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष झालो म्हणजे औरंगाबादहून विधानसभा निवडणूक लढविण्याची माझी इच्छा आहे, असे मुळीच नाही. मला सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची इच्छा आहे.
दि. २५ एप्रिल रोजी आयोजित गांधी भवनातील परिचय मेळावा व सत्कार समारंभाचीही माहिती यावेळी देण्यात आली. हा मेळावा सकाळी ११ वा. सुरूहोईल. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, सरचिटणीस अरुण मुगदिया, आ. सुभाष झांबड, चिटणीस अशोक सायन्ना व समशेरसिंग सोधी, मावळते अध्यक्ष सय्यद अक्रम, नगरसेविका सायली जमादार यांचाही सत्कार करण्यात येणार आहे.
पत्रपरिषदेस भाऊसाहेब जगताप, प्रभाकर मुठ्ठे पाटील, सलीम कादरी, जमील अहमद खान, मनोज पाटील, डॉ. पवन डोंगरे, अकील पटेल, अजीज खोकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: The new executive committee of the Congress will be soon soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.