बाह्यरुग्ण विभागात नवीन अग्निरोधक यंत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:05 AM2021-01-15T04:05:07+5:302021-01-15T04:05:07+5:30
----- मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास प्रतिसाद औरंगाबाद : शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटना व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यावतीने आयोजित मोफत ...
-----
मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास प्रतिसाद
औरंगाबाद : शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटना व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यावतीने आयोजित मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आले. १५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात रोज २० ते २५ शस्त्रक्रिया होत आहेत. यावेळी जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. ज्योती मुंढे, डॉ. पी. एम. कुलकर्णी, डॉ. संतोष काळे, शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. महेश वैष्णव, अरुणकुमार आरक, के. एन. मरमट, डी. ए. जोशी, साकीब खान, अमोल साळवे, वैशाली आव्हाळे, सुहासिनी जावळे, अनिल पवार, प्रभाकर भाले, कल्याण देशमुख, वैशाली डोईफोडे, सुजाता नाईक, वैशाली सोनवणे, श्रीलंका पवार आदींची उपस्थिती होती.
-----------
वैद्यकीय महाविद्यालयातील
स्वच्छतागृहांची दुरवस्था
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. पाईप फुटलेले, नळ, फरशा तुटलेल्या आहेत. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने प्रचंड दुर्गंधीचा त्रास वैद्यकीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
----------
दंत महाविद्यालयात सुरक्षेची खबरदारी
औरंगाबाद : भंडारा येथील घटनेनंतर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातही सुरक्षेसंदर्भात विविध खबरदारी घेण्यात येत आहे. याठिकाणी असलेली अग्निरोधक यंत्रे योग्य जागेत आहे की नाही, याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर काही यंत्रांची जागा बदलून ती गरजेच्या ठिकाणी बसविण्यावर भर देण्यात आला.
-----------
अपघात विभागासमोर कचऱ्याचे ढीग
औरंगाबाद : घाटीतील अपघात विभागासमोरील परिसरात कचऱ्याचे ढीग पडून आहेत. महाविद्यालयाच्या इमारतीकडे जाणाऱ्या मार्गाजवळ स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक दिवस कचरा तसाच पडून राहत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.