औरंगाबादेत काेरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, १०२३ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:04 AM2021-03-15T04:04:51+5:302021-03-15T04:04:51+5:30
औरंगाबाद : कोरोना महामारीच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला. दिवसभरात तब्बल १०२३ नव्या कोरोना ...
औरंगाबाद : कोरोना महामारीच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला रविवारी औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला. दिवसभरात तब्बल १०२३ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली, तर ३६४ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. उपचार सुरू असताना औरंगाबाद जिल्ह्यातील ५ आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ४,९८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५७ हजार ७०१ झाली आहे, तर आतापर्यंत ५१ हजार ३८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,३३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १०२३ रुग्णांत एकट्या मनपा हद्दीतील ७९३, तर ग्रामीण भागातील २३० रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ३०९ आणि ग्रामीण भागातील ५५, अशा एकूण ३६४ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना गंगापूर येथील ३९ वर्षीय पुरुष, न्यू हनुमाननगर, गारखेडा येथील ५७ वर्षीय पुरुष, कंकवटी-कन्नड येथील ६५ वर्षीय महिला, साईनगर-एन-६, सिडकोतील ५५ वर्षीय पुरुष, आळंद-फुलंब्रीतील ७१ वर्षीय पुरुष आणि वाशिम येथील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
नारळीबाग १, घाटी ३, श्रेयनगर ८, जिल्हा रुग्णालय १, उत्तरानगरी २, बजरंग चौक ४, म्हाडा कॉलनी ११, बीड बायपास २१, गारखेडा ६, तापडियानगर २, एन-१ येथे ४, एन -२ येथे ७, एन-३ येथे ३, एन -४ येथे ४, एन -५, सिडको ६, एन -६ येथील ११, एन -७ येथे ५, एन -८ येथे ६, एन -९ येथील ५, एन -११ येथे ६, एन -१२ येथे ८, सेव्हन हिल २, टाऊन सेंटर २, विद्यानगर ३, राजेश नगर बीड बायपास १, त्रिमूर्ती चौक २, शिवाजीनगर ४, एन -११ येथे ४, बायजीपुरा २, जाधववाडी ११, सफलनगर १, मिलिट्री हॉस्पिटल १, मयूरपार्क ७, श्रीकृष्ण नगर १, भाग्यनगर २, वसंत नगर १, सुदर्शन नगर १, सिंधी कॉलनी २, व्यंकटेश नगर २, रामपुरी १, मेहेरनगर ३, सुराणा नगर १, कांचनवाडी ६, एमजीएम परिसर ३, रोकडा हनुमान कॉलनी ४, उल्कानगरी ९, एन -१ येथे १, नक्षत्रवाडी ३, क्रांतीनगर २, सिल्क मिल कॉलनी २, एकनाथनगर १, जयभवानीनगर १, रवींद्र नगर १, बन्सीलालनगर १२, क्रांती चौक २, पडेगाव १०, दशमेश नगर १, स्नेह नगर १, भगतसिंगनगर २, ज्योतीनगर ६, वंदननगर १, समतानगर ३, सातारा परिसर ३, बागलानगर १, सिडको २, मिटमिटा ३, प्रताप नगर ७, केसरी बाजार रोड १, वेदांत कॉलनी १, तिरुपती हॉटेल ३, समर्थ नगर ४, देवगिरी कॉलनी १, ईटखेडा ५, चाणक्यपुरी १, जय विष्णू भारती कॉलनी १, कुंभारवाडा १, गुलमंडी ३, बालाजीनगर ७, एसटी कॉलनी २, गांधीनगर २, टीव्ही सेंटर २, शिवशंकर कॉलनी २, अरिहंत नगर १, उत्तमनगर १, न्यू हनुमाननगर ३, संजयनगर १, उस्मानपुरा ६, माजी सैनिक कॉलनी १, पुंडलिक नगर ३, माया नगर १, नारेगाव ६, न्याय नगर ३, अयोध्या नगर २, जयभवानी नगर ८, चिकलठाणा ८, संभाजी कॉलनी १, जवाहर कॉलनी ४, मुकुंदवाडी १४, रामनगर ९, वानखेडेनगर १, अंबिका नगर हर्सुल ३, प्रकाशनगर १, लघुवेतन कॉलनी २, विवेकानंद नगर २, मिलिंदनगर १, टाऊन सेंटर ३, संजय नगर बायजीपुरा २, ठाकरेनगर ६, नैवेद्य हॉटेल १, प्रकाशनगर १, विष्णूनगर १, उच्च न्यायालय परिसर १, औरंगपुरा ५, राजाबाजार २, एसपीआय हॉस्टेल, हडको ११, हिमायतबाग ४, काबरानगर, गारखेडा २, सुधाकरनगर १, कासलीवाल मार्व्हल १, श्रीकृष्णनगर १, कैलास नगर ४, दर्गा रोड २, जालान नगर १, पद्मपुरा ३, नंदनवन कॉलनी १, गोल्डनसिटी १, दिशा संस्कृती ३, नारळीबाग २, पहाडसिंगपुरा २, दीपनगर २, विश्रामबाग कॉलनी १, रेल्वे स्टेशन परिसर १, नागेश्वरवाडी २, विद्यानिकेतन कॉलनी २, मारिया हॉस्पिटल १, सादातनगर १, कासलीवाल तारांगण २, होनाजीनगर २, पोलीस कॉलनी २, सराफा कॉलनी १, दिशा नगरी १, पांढरी बाग २, समाधान कॉलनी १, सन्मित्र कॉलनी २, निराला बाजार १, भीमनगर १, जालना रोड २, खाराकुवा १, विजयनगर १, भारतमाता मंदिर १, रेणुकानगर १, चिश्तिया कॉलनी १, स्वामी समर्थनगर १, गादिया विहार २, वेदांत नगर १, न्यू गणेश नगर १, भगत नगर ३, राजे संभाजी कॉलनी १, संकल्प नगर १, एकता नगर १, सुरेवाडी ३, सुराणा नगर २, टिळकनगर १, गजानन कॉलनी ५, आकाशवाणी १, भानुदासनगर १, शंभूनगर १, रवींद्रनगर १, राजनगर ३, खिवंसरा पार्क १, नाथनगर १, विष्णू नगर १, ज्ञानेश्वरनगर १, सारंग सोसायटी १, स्टेशन रोड ३, शहानूरवाडी १, समता नगर १, झांबड इस्टेट १, पैठण गेट १, छावणी १, शक्तीनगर १, न्यू शांतीनिकेतन कॉलनी १, मयूरबन कॉलनी १, मकसूद कॉलनी १, अन्य २०४
ग्रामीण भागातील रुग्ण
गंगापूर २, बजाजनगर ४३, आडूळ १, वरुड काजी १, फुलंब्री २, रांजणगाव १, शेंद्रा एमआयडीसी ३, पिसादेवी १, मिसारवाडी ३, वाळूज ३, तिसगाव २, कुंभेफळ १, सावंगी १, वडगाव कोल्हाटी ४, सिडको महानगर ८, पंढरपूर १, वरुड काझी १, सिल्लोड १,बिडकीन १, वाळूज १, अन्य १४९