जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, दिवसभरात तब्बल ९०२ नव्या रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:02 AM2021-03-13T04:02:17+5:302021-03-13T04:02:17+5:30

औरंगाबाद : एका दिवसातील कोरोनाच्या उच्चांकी रुग्णसंख्येने गुरुवारी आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण जिल्हा हादरून गेला. दिवसभरात विक्रमी ९०२ नव्या कोरोना ...

New high number of corona patients in the district, an increase of 902 new patients in a day | जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, दिवसभरात तब्बल ९०२ नव्या रुग्णांची वाढ

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, दिवसभरात तब्बल ९०२ नव्या रुग्णांची वाढ

googlenewsNext

औरंगाबाद : एका दिवसातील कोरोनाच्या उच्चांकी रुग्णसंख्येने गुरुवारी आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण जिल्हा हादरून गेला. दिवसभरात विक्रमी ९०२ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात एकट्या मनपा हद्दीतील म्हणजे औरंगाबाद शहरातील ६७९ रुग्णांचा समावेश आहे, तर ग्रामीण भागालाही कोरोनाने पुन्हा विळख्यात घेतले आहे. शिवाय उपचार सुरू असताना सहा महिन्यांनंतर एका दिवसात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान वाढले आहे. जिल्ह्यात सध्या ४,१३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता ५५ हजार ३४१ झाली आहे, तर आतापर्यंत ४९ हजार ८९० रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,३२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ९०२ रुग्णांत मनपा हद्दीतील ६७९, तर ग्रामीण भागातील २२३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील २३१ आणि ग्रामीण भागातील ४६, अशा एकूण २७७ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना सेलगाव, औरंगाबाद येथील ७० वर्षीय पुरुष, एन पाच सिडकोतील ४८ वर्षीय स्त्री, जय हिंदनगर, पिसादेवी येथील ६५ वर्षीय पुरुष, सिद्धार्थ गार्डन, मिल कॉर्नर परिसरातील ४५ वर्षीय पुरुष, एन पाच सिडकोतील ८४ वर्षीय पुरुष, गंगापूर तालुक्यातील माळी वडगाव येथील ६४ वर्षीय पुरुष, नक्षत्रवाडीतील ८७ वर्षीय पुरुष, बीड बायपास येथील ७१ वर्षीय पुरुष, हर्सुल येथील ७२ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

सिडको १०, प्रगती कॉलनी १, घाटी परिसर ४, म्हाडा कॉलनी ४, ब्रिजवाडी १, सुंदरवाडी १, प्रतापनगर ३, एमआयडीसी १, फाजीलपुरा १, कुंभारगल्ली बेगमपुरा १, नारळीबाग ५, नंदनवन कॉलनी ३, सुदर्शन नगर १, एमजीएम हॉस्पिटल १, मिलिट्री हॉस्पिटल १, मयूर पार्क ३, उल्कानगरी ९, भावसिंगपुरा १, राजेशनगर ५, पैठण रोड ३, स्नेह नगर ३, टिळकनगर १, समर्थनगर ३, सत्कर्मनगर १, छत्रपतीनगर ५, नाथ गल्ली १, पहाडसिंगपुरा १, छावणी १, राहत कॉलनी १, आकाशवाणी परिसर १, संभाजी कॉलनी २, एन अकरा ३, बाजीप्रभू नगर ७, नागेश्वरवाडी १, शिवाजी नगर २, चाटे स्कूल जवळ १, देवानगरी ३, हर्सुल ४, सातारा परिसर १५, जान्हवी रेसिडन्सी १, राधास्वामी कॉलनी १, एन अकरा, रवीनगर १, होनाजीनगर ४, रमानगर २, एन बारा येथे १, आयडीबीआय बँक परिसर, शनि मंदिराजवळ १, विजयनगर २, माजी सैनिक कॉलनी, पडेगाव २, दर्गा रोड परिसर २, शांतीनिकेतन कॉलनी १, शहानूरवाडी , दीपनगर ५, क्रांती चौक ५, अलकनंदा कॉम्प्लेक्स १, सिटी प्राईड १, चिकलठाणा परिसर १, बन्सीलाल नगर ४, कार्तिक हॉटेल परिसर १, एट्रंस हाऊसर कंपनी परिसर ३, श्रेय नगर ३, एन दोन राम नगर ३, कोकणवाडी १, एन तीन येथे ७, गजानन मंदिर परिसर २, बीड बायपास १०, एसटी कॉलनी १, उस्मानपुरा ४, मुकुंदवाडी ८, विवेक नगर १, एन चार सिडको ६, शिवशक्ती कॉलनी १, जय भवानीनगर ६, पिसादेवी ३, पुंडलिकनगर ६, सेव्हन हिल इंद्रायणी हॉस्टेल १, एन दोन, श्रद्धा कॉलनी १, जटवाडा रोड ३, गणेशनगर, गारखेडा १, पेशवे नगर १, हनुमाननगर ५, एन पाच वीर सावरकर नगर २, आदिती नगर, हर्सुल १, गजानन नगर, गारखेडा ३, संजय नगर १, नारेगाव १, शिवनेरी कॉलनी २, नाईक नगर १, रेल्वे स्टेशन परिसर १, सिल्क मिल कॉलनी १, मुकुंद नगर २, रोपळेकर हॉस्पिटल परिसर १, देवळाई चौक १, इंदिरा नगर १, गारखेडा परिसर ४, गुलमंडी १, आलोकनगर ३, शिवशंकर कॉलनी २, सिंधी कॉलनी २, पांडुरंग नगर १, बीआर कॉलनी १, न्यू गजानन कॉलनी १, जवाहर कॉलनी १, बजाज विहार ३, आरबीएन सो. १, चेतक घोडा परिसर १, बालाजी नगर ३, एन सात सिडको ५, जय हिंद नगर ३, एन नऊ येथे १, पैठण रोड १, एन सहा, आविष्कार कॉलनी १, जयसिंगपुरा १, तापडिया प्राईड, पैठण रोड १, रामानंद कॉलनी, जालना रोड २, रंगार गल्ली १, मिल कॉर्नर १, कांचनवाडी ७, मोतीकारंजा, मोंढा १, सन्मित्र कॉलनी १, नंदिग्राम कॉलनी १, औरंगपुरा १, दशमेशनगर १, जालननगर २, सप्तशृंगीनगर १, कैलास नगर १, रोकड हनुमान कॉलनी २, गादिया विहार ९, उदय कॉलनी १, सिंधू कॉलनी १, पंचवटी हॉटेल परिसर ४, पवननगर १, नवजीवन कॉलनी १, उदय नगर १, भुजबळनगर १, शहाबाजार १, कलेक्टर ऑफिस परिसर १, एन अकरा हडको १, शिवेश्वर कॉलनी १, दांगट गल्ली १, समतानगर १, ठाकरे नगर १, सेनानगर १, एन तेरा हडको २, पाथरीकर नगर १, महेश नगर १, तापडिया नगर ३, जाधववाडी १, जवाहर कॉलनी १, सूतगिरणी चौक परिसर २, नाहद कॉलनी १, संयोग नगर १, साराकृती पैठण रोड १, तक्षशील नगर १, इटखेडा ४, पद्मपुरा ५, बीएसएनएल ऑफिस परिसर १, वेदांतनगर २, जि. प. शासकीय निवासस्थान परिसर १, खाराकुँवा १, क्रांती चौक पोलीस स्टेशन परिसर १, अंबा-अप्सरा टॉकिज परिसर १, अग्निशमन केंद्र परिसर, रेल्वे स्टेशन १, अलंकार सो. २, काला सो. १, शिल्पनगर १, ज्योतीनगर २, महेंद्रकर हॉस्पिटल परिसर १, सेव्हन हिल, राणानगर २, समाधान कॉलनी १, शेवाळे हॉस्पिटल परिसर १, नाथनगर १, लक्ष्मीनगर १, हडको १, एन पाच अरुणोदय कॉलनी १, बँक कॉलनी, सातारा परिसर १, कासलीवाल तारांगण, मिटमिटा १, रघुवीर नगर १, बेस्ट प्राईड परिसर १, मातोश्रीनगर १, नक्षत्रवाडी १, नक्षत्र पार्क १, शंकर नगर, इटखेडा १, धूत बंगला परिसर, स्टेशन रोड १, सुराणानगर १, एमजीएम हॉस्पिटल परिसर २, कोहिनूर कॉलनी १, राजेश अपार्टमेंट १, एन सहा सिडको १, आयकॉन हॉस्पिटल परिसर १, पेठे नगर १, पडेगाव १, अन्य २७९.

ग्रामीण भागातील रुग्ण

गंगापूर २, कानडगाव १, वाहेगाव १, वाळूज ४, बिडकीन २, खिर्डी, खुलताबाद २, कन्नड १, चित्तेपिंपळगाव १, पाथरी, फुलंब्री १, वडगाव को ८, बजाजनगर ९, सिडको महानगर एक ३, सीतानगर, साई श्रद्धा पार्क सिडको महानगर एक १, आंबेलोहळ २, ज्योतीनगर, दौलताबाद १, चौका १, विटावा १, तीसगाव १, अन्य १८१.

---

जिल्ह्यात यापूर्वी एका दिवशी आढळलेले रुग्ण

९ मार्च २०२१ - ५५० रुग्ण

१० मार्च २०२१ - ५३२ रुग्ण

८ सप्टेंबर २०२० - ४८६ रुग्ण

३ सप्टेंबर २०२० - ४६६ रुग्ण

१० सप्टेंबर २०२० - ४३७ रुग्ण

Web Title: New high number of corona patients in the district, an increase of 902 new patients in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.