राजकारणात नवीन आयडिया सोशल मीडिया
By Admin | Published: August 3, 2014 12:57 AM2014-08-03T00:57:07+5:302014-08-03T01:11:28+5:30
औरंगाबाद : वेगवेगळ्या क्षेत्रांत विज्ञानाने क्रांती घडवून आणली. राजकीय क्षेत्रही यापासून अलिप्त राहू शकत नाही.
औरंगाबाद : वेगवेगळ्या क्षेत्रांत विज्ञानाने क्रांती घडवून आणली. राजकीय क्षेत्रही यापासून अलिप्त राहू शकत नाही. वेबसाईटपेक्षा पुढे जाऊन राजकीय मंडळींनी फेसबुक आणि व्हॉटस्अपचा जोरदार वापर सुरू केला आहे. सोशल साईटचा वापर ही एक आत्मसमाधानाची बाब असून, याचा वापर करणारे १४.८ टक्के नागरिक आहेत.
देशात मोबाईल ग्राहक झपाट्याने इंटरनेटकडे वळत आहेत. एका सर्वेक्षणानुसार देशात पन्नास टक्क्यांहून अधिक मोबाईल ग्राहक इंटरनेटचा वापर करतात. आपल्या मोबाईलच्या बिलातील सुमारे ४५ टक्के रक्कम ते इंटरनेटच्या वापरावर खर्च करतात. याचा थेट लाभ सामाजिक आणि व्यावसायिकांनंतर राजकीय मंडळीही करीत आहे. शहरात शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनीही आपली वेबसाईट फार पूर्वीच सुरू केली. राजेंद्र दर्डा फेसबुक आणि व्हॉटस्अपवरही वैयक्तिकरीत्या वेळ देतात. त्याचप्रमाणे कॅबिनेटमंत्री अब्दुल सत्तार, खा. चंद्रकांत खैरे हेसुद्धा फेसबुकवर सक्रिय आहेत. आमदारांमध्ये सतीश चव्हाण, संजय शिरसाट, जालन्याचे कैलास गोरंट्याल फेसबुकवर सक्रिय आहेत.
राजकीय मंडळीही आता सोशल साईटस्ला एक आवश्यक तंत्र समजत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या आवश्यकताही ते पूर्ण करीत आहेत. या कार्यामुळेच राजकीय मंडळी आपल्या टीमसोबत वाटचाल करीत आहे. तांत्रिकरीत्या सक्षम असलेले काही नेते आपले काम स्वत: करीत आहेत. काही जण असेही आहेत की, छंद आणि एकमेकांचे पाहून एकदा कार्याला सुरुवात करतात आणि नंतर नवीन परिवर्तन विसरून जातात. त्यामुळे सोशल नेटवर्किंगमध्ये त्यांची लोकप्रियता राहत नाही.
सर्वसामान्यपणे सोशल नेटवर्किंगवर राजकीय नेत्यांच्या दैनंदिन उपक्रमाला प्राधान्यता देण्यात येत आहे. काही ठिकाणी तर संवादही ठेवण्यात येत आहे. व्हॉटस्अप सूचना पोहोचवण्यासाठी मोठे साधन ठरत आहे. कोणतीही सूचना कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवता येते.
शहरी भागात सोशल नेटवर्किंगची मोठी क्रेझ असली तरी ग्रामीण भागात बऱ्याच मर्यादा आहेत. अनेक दुर्गम भागांमध्ये इंटरनेटची चांगली सेवा मिळत नसल्याने मोबाईल ग्राहक या सेवेपासून वंचित आहेत. इंटरनेटमुळे मोबाईल कंपन्यांना चांगले दिवस प्राप्त झाले आहेत. त्यांना आपले जाळे असून पाहिजे तेवढे पसरविता आले नाही. देशात मोबाईलवर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या १४.८ एवढीच आहे. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद आदी मोठ्या शहरांमध्ये मोबाईलचा वापर करणारे ३९.५ टक्के नागरिक आहेत. ग्रामीण भागात फक्त ३.७ टक्के नागरिक आहेत. ही परिस्थिती सर्व प्रयत्नांना खीळ घालणारी आहे.
देशात मोबाईलवर इंटरनेट वापरणारे
एकूण मोबाईल इंटरनेट यूजर्स- १४.८ टक्के
शहरी मोबाईल इंटरनेट यूजर्स- ३९.५ टक्के
(नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद आदी शहरे)
ग्रामीण मोबाईल इंटरनेट युजर्स- ३.७ टक्के
सर्वाधिक उपयोग- फेसबुक, व्हॉटस् अप आणि यू ट्यूब