रात्री ९ वाजेनंतर सर्व बाजारपेठा बंद करण्याचे नव्याने आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:36 PM2020-09-22T23:36:34+5:302020-09-22T23:36:42+5:30

औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली असली तरी हॉटेल, परमीटरुम, रेस्टॉरंट यांना अद्याप मुभा दिलेली नाही. असे असले ...

New order to close all markets after 9 pm | रात्री ९ वाजेनंतर सर्व बाजारपेठा बंद करण्याचे नव्याने आदेश

रात्री ९ वाजेनंतर सर्व बाजारपेठा बंद करण्याचे नव्याने आदेश

googlenewsNext

औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली असली तरी हॉटेल, परमीटरुम, रेस्टॉरंट यांना अद्याप मुभा दिलेली नाही. असे असले तरी शहर व परिसरात ‘नाईटलाईफ’ फोफावल्यामुळे कोरोना रुग्णवाढीचा टक्का वाढतो आहे. नाईटलाईफला लगाम घालण्यासाठी रात्री ९ वाजेनंतर सर्व बाजारपेठांमधील दुकाने उघडी आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्याचे आज आदेश  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी  मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. १६ सप्टेंबर रोजी देखील जिल्हाधिकाºयांनी याबाबत आदेश दिले होते. दुकाने उघडी आढळली तर सील करण्यात येतील, हॉटेल्समध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असे मनपा आणि पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. मंगळवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. ८.३० वाजताच दुकाने बंद  होण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. यासाठी दोन राजपत्रित अधिकारी, दोन दुकान निरीक्षकांचे पथक तसेच तीन पथक पेट्रोलिंग करतील. दुकाने वा कुठे सोशल डिस्टंन्सिंगचे नियम तोडून गर्दी झालेली असेल तर कारवाई करण्यात येईल, असे मनपा प्रशासनाने सांगितले. गेल्या पंधरवड्यात नाईटलाईफच्या अनुषंगाने बाजारपेठा ९ वाजेनंतर बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी मनपा आणि पोलीस यंत्रणेकडून होणे गरजेचे होते, तसे झाले नसल्यामुळे नव्याने आदेश दिले आहेत काय ? यावर जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, मिशन बिगीनचा गैरफायदा घेणाºयांवर गुन्हे दाखल करण्यास आज सांगितले आहे. कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणा काम करीत आहे. कुणीही दुर्लक्ष करीत नाही. आजपासून कारवाई करतांना उल्लंघन करणाºया ठिकाणचे फोटो, शूटींग करण्यास सांगितले आहे. तसेच रात्री ९ वाजेनंतर दुकाने, हॉटेल्स, आस्थापना सुरू असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी देखील केली आहे. त्यामुळे रात्री ९ नंतर दुकाने, हॉटेल्स, आस्थापना सुरू असल्याचे आढळल्यास नोंदणी रद्द करण्याचा कारवाई करण्यात येईल.

Web Title: New order to close all markets after 9 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.