नवीन तांदूळ बाजारात, पण खवय्यांना मोजावे लागतील जास्त पैसे, कोलम ६५ रुपये किलो तर.. 

By प्रशांत तेलवाडकर | Published: March 14, 2024 06:56 PM2024-03-14T18:56:07+5:302024-03-14T18:56:26+5:30

सुगंधी चिन्नोर तांदळापासून ते बासमती तांदळापर्यंत सुमारे ७० प्रकारचे तांदूळ आजघडीला बाजारात विक्री होत आहेत.

New rice in the market, but gourmets will have to pay more, kolam Rs 65 per kg. | नवीन तांदूळ बाजारात, पण खवय्यांना मोजावे लागतील जास्त पैसे, कोलम ६५ रुपये किलो तर.. 

नवीन तांदूळ बाजारात, पण खवय्यांना मोजावे लागतील जास्त पैसे, कोलम ६५ रुपये किलो तर.. 

छत्रपती संभाजीनगर : भात खाल्ला नाही की, जेवण पूर्ण झाले नाही, असे अनेकांना वाटते. अनेकांना भात-वरण खाल्ल्यावरच तृप्तीचा ढेकर येतो. एवढी भाताची सवय झाली आहे. मात्र, यंदा तांदळाचे उत्पादन कमी असल्याने खवय्यांना तांदूळ खरेदीसाठी थोडे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दिवाळीआधी ५६ रुपये किलोने विक्री होणारा कोलम तांदूळ सध्या ६५ रुपये किलो विकत आहे.

नवीन तांदूळ बाजारात दाखल
दिवाळीनंतर नवीन तांदळाची आवक बाजारात सुरु झाली. सुगंधी चिन्नोर तांदळापासून ते बासमती तांदळापर्यंत सुमारे ७० प्रकारचे तांदूळ आजघडीला बाजारात विक्री होत आहेत.

तांदळाचे भाव काय ? (प्रति किलो)
प्रकार सध्याचे भाव दिवाळीआधीचे भाव
कोलम ६०-६५ रु.----- ५६-६० रु.
काली मूँछ ७०-७५ रु.----- ६५-६८ रु.
आंबेमोहर ६४-६५ रु.---- ६८-७० रु.
चिन्नोर ४८-५० रु.----४०-४४ रु.
बासमती ६०-१८० रु.---६०-१८० रु.

भाव आणखी कमी होणार का ?
सर्व प्रकारचे तांदूळ बाजारात दाखल झाले आहेत. बासमती तांदळाची निर्यात कमी केल्याने त्याचे भाव टिकून आहेत. यंदा तांदूळ उत्पादक महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात उत्पादन कमी असल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भाव आणखी कमी होणार नाही व जास्तही वाढणार नाही. वर्षभर भाव स्थिर राहतील.
- नीलेश सोमाणी, व्यापारी

Web Title: New rice in the market, but gourmets will have to pay more, kolam Rs 65 per kg.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.