श्रावणात न्यू ट्रेंड! महादेवाच्या टॅट्यूमध्ये सजीवपणा आणण्यात ‘एआय’चा हात

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 14, 2024 04:29 PM2024-08-14T16:29:34+5:302024-08-14T16:30:11+5:30

महादेव आपल्यासोबत राहावा यासाठी तरुण भक्तांमध्ये दंडावर, मनगटावर, पाठीवर, छातीवर एवढेच नव्हे तर आता मानेवरही टॅट्यू काढून घेतले जात आहे.

New trend in Shravan! AI's hand in bringing Mahadev's tattoos to alive | श्रावणात न्यू ट्रेंड! महादेवाच्या टॅट्यूमध्ये सजीवपणा आणण्यात ‘एआय’चा हात

श्रावणात न्यू ट्रेंड! महादेवाच्या टॅट्यूमध्ये सजीवपणा आणण्यात ‘एआय’चा हात

छत्रपती संभाजीनगर : कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स)चा वापर आता सर्व क्षेत्रांत होऊ लागला आहे. एवढेच नव्हे तर महादेवाचे टॅट्यू बनविण्यातही ‘एआय’चा वापर होताना दिसत आहे. होय, महादेव, त्रिशूल आपल्या सोबत राहावे, यासाठी तरुणाई टॅट्यू काढून घेत आहे. इतरांपेक्षा आपले टॅट्यू ‘जरा हटके’ दिसावे, यासाठी चक्क ‘एआय’चा वापर करून नवीन डिझाइन बनविले जात आहे. याशिवाय संस्कृतमधील काही श्लोक किंवा त्याच्या ओळी हातावर गोंदवून घेण्याकडे कल वाढला आहे.

श्रावण महिना सुरू असून मागील काही वर्षांत महादेव भक्तांची संख्या वाढली आहे. यात तरुणाईची संख्या अधिक आहे. महादेव आपल्यासोबत राहावा. यासाठी दंडावर, मनगटावर, पाठीवर, छातीवर एवढेच नव्हे तर आता मानेवरही टॅट्यू काढून घेतले जात आहे.

काय बदल घडला

पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीने टॅट्यू काढत होतो; पण आता ‘एआय’मुळे नवनवीन डिझाइन मिळू लागल्या आहेत. आधी आम्ही फोटोशॉपचा वापर करत आता ‘एआय’ची मदत होत आहे. यात महादेव, त्रिशूल, डमरू, सोबत संस्कृती श्लोकही नावीन्यपूर्ण आकर्षक शैलीत आम्हाला मिळत आहे. हे टॅट्यूला तरुणाईमध्ये प्रिय झाले आहेत. सध्या महादेवाचे पोर्ट्रेट बोस्ड टॅटू ट्रेंडमध्ये आहे. त्यांचा आकार १५ ते २० इंचांपर्यंत असतो. टॅट्यूचे डिझाइन शोधण्यासाठी ‘एआय’चे सोशल मीडियावर अनेक ॲप उपलब्ध झाले आहे. आता तर व्हॉटस्ॲपवरही ‘एआय’ अवतरले आहे. याचाच फायदा टॅट्यू आर्टिस्ट घेत यात नावीन्यता आणत आहेत.
- सीमा कस्तुरे, टॅटू आर्टिस्ट

अमेरिकेन शाईचा वापर
टॅट्यूमध्ये दोन प्रकार आहेत. एक कायमस्वरूपी व दुसऱ्या तात्पुरता टॅट्यू असतो. यासाठी खास अमेरिकेच्या शाई (इंक)चा वापर केला जातो. ही शाई त्वचेसाठी नुकसानदायक नसते.

१) ५०० ते १ लाख रुपयांपर्यंत आकारानुसार टॅट्यूची किंमत
२) शहरात १५० पेक्षा अधिक टॅट्यूची दुकान
३) १ इंचांपासून ते २० इंचांपर्यंतचे टॅट्यू काढले जाते.
४) टॅट्यू काढण्यासाठी आकारानुसार अर्धा तास ते ६ तासांपर्यंत लागतो वेळ.
 

Web Title: New trend in Shravan! AI's hand in bringing Mahadev's tattoos to alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.