घाटीत महिला रुग्णांसाठी ४० खाटांचा नवीन वाॅर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:02 AM2021-06-10T04:02:12+5:302021-06-10T04:02:12+5:30
औरंगाबाद : घाटीतील जुन्या वॉर्ड क्रमांक चारचे नूतनीकरण करुन अद्ययावत अशा प्रकारच्या ४० ऑक्सिजन खाटांचा स्वतंत्र नवीन वॉर्ड तयार ...
औरंगाबाद : घाटीतील जुन्या वॉर्ड क्रमांक चारचे नूतनीकरण करुन अद्ययावत अशा प्रकारच्या ४० ऑक्सिजन खाटांचा स्वतंत्र नवीन वॉर्ड तयार करण्यात आला आहे. या वॉर्डामध्ये कोरोना निगेटिव्ह महिला रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
या वॉर्डचे उद्घाटन बुधवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. भारत सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे के. एम. आय. सय्यद, मुकुंद फुलारे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांची उपस्थिती होती.
दोन दिवसांपूर्वीही वाॅर्डात दीप प्रज्वलन
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे ७ जून रोजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत घाटीला हस्तांतरण झाले. याप्रसंगी याच नव्या वाॅर्डात लोकप्रतिनिधींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले होते. याच वाॅर्डाचे बुधवारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन उद्घाटन करण्यात आले.
फोटो ओळ....
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून घाटीतील वाॅर्ड क्रमांक चारचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, डॉ. सुरेश हरबडे आदी.