नवीन पाणीपुरवठ्याचा डीपीआर अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:13 AM2019-07-11T00:13:44+5:302019-07-11T00:14:05+5:30

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) महापालिकेने तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे शनिवारी सादर केला. जीवन प्राधिकरणाने बुधवारी महापालिकेला एक पत्र दिले असून, तांत्रिक मंजुरी हवी असेल तर १६७३ कोटी रुपयांच्या एक टक्का म्हणजेच १६ कोटी ९६ लाख रुपये भरण्यास सांगितले आहेत.

New Water Supply DPR stuck | नवीन पाणीपुरवठ्याचा डीपीआर अडकला

नवीन पाणीपुरवठ्याचा डीपीआर अडकला

googlenewsNext
ठळक मुद्दे१७ कोटींची मागणी : महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाचे मनपाला पत्र


औरंगाबाद : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) महापालिकेने तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे शनिवारी सादर केला. जीवन प्राधिकरणाने बुधवारी महापालिकेला एक पत्र दिले असून, तांत्रिक मंजुरी हवी असेल तर १६७३ कोटी रुपयांच्या एक टक्का म्हणजेच १६ कोटी ९६ लाख रुपये भरण्यास सांगितले आहेत. मनपाची आर्थिक अवस्था पाहता तांत्रिक मंजुरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
समांतर पाणीपुरवठा योजना रद्द झाल्यानंतर मनपाने नवीन पाणीपुरवठा योजना तयार केली आहे. १६७३ कोटी रुपयांच्या योजनेचा डीपीआर चार दिवसांपूर्वीच शासन आदेशानुसार मनपाने महाराष्टÑ जीवन प्र्राधिकरणाला सादर केला. डीपीआरला तांत्रिक मंजुरी हवी असेल तर शासन नियमानुसार योजनेच्या १ टक्का म्हणजे १६ कोटी ९६ लाख रुपये त्वरित भरा, असे पत्र एमजीपीने आज मनपाला दिले. त्यामुळे मनपा नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मुहूर्तालाच संकटात सापडली आहे. महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. त्यामुळे १७ कोटी आणायचे कोठून, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. १५ दिवसांत हा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठविण्याची तयारी महापालिकेने केली होती. आता १७ कोटीच्या रकमेवर तोडगा निघेपर्यंत योजनेचा प्रस्ताव लांबणीवर परतण्याची शक्यता आहे.
डीपीआर वाढविणार
डीपीआर तब्बल १६९२ कोटींवर गेलेला असताना तांत्रिक मंजुरीच्या रकमेचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे डीपीआरच्या रकमेत वाढ करून शासनाकडून निधी मंजूर झाल्यानंतर तो जीवन प्राधिकरणाला देण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी संपर्क साधून डीपीआरमधून जीवन प्राधिकरणाचा निधी देण्यासाठी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी महापौरांनी केली.
------------

Web Title: New Water Supply DPR stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.