नवगुन्हेगार ठरताहेत पोलिसांसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:04 AM2021-06-19T04:04:12+5:302021-06-19T04:04:12+5:30
औरंगाबाद : कोविड संसर्गामुळे गतवर्षी शहरातील गुन्हेगारीत घट झाली होती. गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या काही वर्षांपासून शहरातील गुन्हेगारी घटनांचा ...
औरंगाबाद : कोविड संसर्गामुळे गतवर्षी शहरातील गुन्हेगारीत घट झाली होती. गतवर्षीचा अपवाद वगळता गेल्या काही वर्षांपासून शहरातील गुन्हेगारी घटनांचा आलेख चढता आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या यादीत सरासरी दहा ते पंधरा टक्के नवीन गुन्हेगारांची भर पडते. हे गुन्हेगार पकडले जात नाहीत, तोपर्यंत ते बिनधास्तपणे गुन्हे करतात. यासोबतच परराज्यातील आणि परजिल्ह्यातील गुन्हेगार अचानक येथे येतात आणि गुन्हे करून निघून जातात. हे गुन्हेगार पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येते. कोविड महामारीमुळे गतवर्षी २०२० मध्ये चार महिने कडक लॉकडाऊन होते. या कालावधीत नागरिक घरात बसून होते, तर पोलीस रस्त्यावर बंदोबस्तावर होते. यामुळे गतवर्षी शहरातील खुनाच्या घटनेत १२ टक्के घट झाली, तर जबरी चोरीच्या घटनांमध्ये ५९ टक्के आणि घरफोडीच्या घटना सात टक्क्यांनी कमी झाल्या होत्या. यावर्षी मात्र जानेवारी ते १७ जूनपर्यंत खुनाच्या १७ घटना घडल्या आहेत. खुनाचा प्रयत्नाच्या २३ घटना पोलिसांत दाखल झाल्या. वाहनचोरी, घरफोडी आदी केवळ ३० ते ३२ टक्केच गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश येते. गुन्हेगारी क्षेत्रात नव्याने दाखल होणाऱ्या गुन्हेगारांची संख्या सरासरी पंधरा टक्के असते. जे गुन्हेगार जोपर्यंत पकडले जात नाहीत तोपर्यंत त्यांचे पाेलिसांकडे रेकॉर्ड तयार होत नाही. परिणामी अशा गुन्हेगारांकडे पोलिसांचे लक्ष जात नाही आणि ते मोकाटपणे गुन्हे करतात. आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारांची ओळख पटविणे पोलिसांना शक्य होत आहे. मात्र, जोपर्यंत ते कॅमेऱ्यात येत नाही, तोपर्यंत ते पोलिसांसाठी डोकेदुखी ठरतात.
कोट
दरवर्षी नव्या गुन्हेगारांची भर पडत असली तरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील काही हिस्ट्रीशिटर निष्क्रिय होतात. गुन्हेगारांवर पोलिसांकडून तडीपार, एमपीडीएसारखी कारवाई होते. शिवाय काही गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याबद्दल शिक्षाही होते. यामुळे त्यांना जेलमध्ये राहावे लागते. गुन्हेगारांना समाजात आणि नातेवाइकांकडून प्रेम मिळत नाही. यामुळे काही गुन्हेगार गुन्हेगारी क्षेत्र सोडतात, तर काही राजकारणात जातात, तर काही दुसऱ्या शहरात स्थलांतरित होतात. पोलिसांच्या रेकॉर्डवर गुन्हेगाराची नोंद होताच त्याच्यावर पोलीस लक्ष ठेवून असतात.
- निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपायुक्त
--------------:
२०२१ मधील घटना
खून - १७
खुनाचा प्रयत्न -
दराेडा -
घरफोड्या - ३७
--------------------
२०२० मधील घटना
खून- २३
खुनाचा प्रयत्न -००
दरोडा-९
घरफोड्या-४९
------------------------
२०१९मधील घटना
खून- ३४
खुनाचा प्रयत्न- ४७
दरोडा-६
---------
मानसोपचार तज्ज्ञांचा कोट आहे...
डमी स्टार क्रमांक ८२४