नवनिर्वाचित सदस्यांना आता सरपंच पदाच्या आरक्षणाचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:04 AM2021-01-20T04:04:27+5:302021-01-20T04:04:27+5:30

घाटनांद्रा : राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना आता सरपंच कोण याची ...

Newly elected members are now awaiting reservation for the post of Sarpanch | नवनिर्वाचित सदस्यांना आता सरपंच पदाच्या आरक्षणाचे वेध

नवनिर्वाचित सदस्यांना आता सरपंच पदाच्या आरक्षणाचे वेध

googlenewsNext

घाटनांद्रा : राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना आता सरपंच कोण याची उत्सुकता लागली आहे. राज्य सरकारने सरपंच पदाच्या आरक्षणाची दिलेली स्थगिती उठवून कधी आरक्षण जाहीर होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरपंचपदाच्या आरक्षणावरच ग्रामपंचायतीचा नवनिर्वाचित सरपंच ठरणार आहे.

कोरोना संकटामुळे राज्य सरकारने स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती दिली. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच व सदस्यांना काही महिने मुदतवाढ मिळाली. त्यानंतर सरकारने ग्रामपंचायती बरखास्त करून त्याठिकाणी प्रशासकांची नियुक्ती केली. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्याचे पाहून निवडणुक आयोगाने ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा व त्याचबरोबर मतदार यादींचा कार्यक्रम जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाने सरपंच पदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला. तत्पूर्वी सरकारने थेट जनतेमधून ग्रामपंचायतीचा सरपंच निवडण्याचा निर्णय मागे घेऊन सदस्यांमधूनच सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेकांना सरपंच होण्याचे वेध लागले. परिणामी निवडणुकीत चुरस वाढीस लागून गावोगावी वातावरण चांगलेच तापले होते.

प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने एकत्र येऊन भाजपविरोधी पॅनल ग्रामपंचायत निवडणुकीत उभे केले होते. या सर्व निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर होताच. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना मोठे धक्के बसले. तर काही ठिकाणी नवोदित तरुणांच्या हाती सत्ता सोपवली.

आता या निवडुन आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना कोण होणार सरपंच याविषयी उत्सुकता निर्माण झाली. शासन सरपंचपदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम कधी जाहीर करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागुन राहीले आहे. त्यामुळे सरपंचपद आपल्याला मिळावे अशी मनोमनी प्रार्थना केली जात आहे.

-----------------

आरक्षणावरच होईल आखणी

ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने होत असल्याने गेल्या दोन निवडणुकीत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण होते. संभाव्य आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी असेल याचे अंदाज बांधले जात आहे. येत्या काही दिवसात सरपंच पदाचा आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Newly elected members are now awaiting reservation for the post of Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.