नवविवाहित महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:05 AM2021-05-30T04:05:01+5:302021-05-30T04:05:01+5:30

वीरगाव : पंधरा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील माळी घोगरगाव शिवारात ...

Newlywed woman commits suicide by jumping into a well | नवविवाहित महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

नवविवाहित महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

googlenewsNext

वीरगाव : पंधरा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील माळी घोगरगाव शिवारात उघडकीस आली. सारिका सोमनाथ पेदे (१९, रा. नागमठाण) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

सारिका ही दोन दिवसांपूर्वी माहेरी नागमठाण येथे गेली होती. माहेराहूनच ती कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. यासंदर्भात कुटुंबीयांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली होती. तोच माळी घोगरगाव येथील निवृत्ती नवले यांच्या मालकीच्या विहिरीत शुक्रवारी सायंकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी पोलीस पाटील राजेंद्र साळुंखे यांना माहिती दिली. साळुंखे यांनी वीरगाव पोलीस ठाण्यास कळविले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर मृतदेह सारिका पेदे हीचा असल्याची ओळख पटली. याप्रकरणी वीरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. पुढील तपास फौजदार नवनाथ कदम, जमादार बाम्हदे, पोलीस नाईक शिवनाथ सरोदे हे करीत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वीच झाला होता विवाह

नागमठाण येथील सारिकाचा पंधरा दिवसांपूर्वीच माळी घोगरगांव येथील सोमनाथ पेदे यांच्याशी रीतिरिवाजप्रमाणे विवाह झाला होता. विशेष म्हणजे नवरदेवाकडील मंडळीने तिच्या आईवडिलांना दीड लाख रुपये दिले असल्याचे सांगितले जात आहे. नवविवाहिता असल्याने सासरी-माहेरी जाणे सुरूच होते. त्यातच तीन दिवसांपूर्वी ती माहेरी नागमठाण येथे गेली होती. तेथूनच घराबाहेर पडून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. मात्र, ही आत्महत्या का केली याबाबत अद्याप कळू शकले नाही.

फोटो : मयत सारिका पेदे

Web Title: Newlywed woman commits suicide by jumping into a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.