एनएचके, कॉस्मोची प्रतिस्पर्धी संघांवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:54 AM2018-03-12T00:54:58+5:302018-03-12T00:55:18+5:30
एमजीएम क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत एन.एच.के. संघाने राज्य वस्तू व सेवाकर संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अन्य लढतीत कॉस्मो फिल्म संघाने एशियन हॉस्पिटल संघावर २५ धावांनी सहज मात केली. ज्ञानेश्वर वैद्य आणि सचिन चोबे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. कॉस्मो फिल्म्सचा कर्णधार सतीश जामखेडकर याने भेदक मारा करीत आपला विशेष ठसा उमटवला.
औरंगाबाद : एमजीएम क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत एन.एच.के. संघाने राज्य वस्तू व सेवाकर संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अन्य लढतीत कॉस्मो फिल्म संघाने एशियन हॉस्पिटल संघावर २५ धावांनी सहज मात केली. ज्ञानेश्वर वैद्य आणि सचिन चोबे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. कॉस्मो फिल्म्सचा कर्णधार सतीश जामखेडकर याने भेदक मारा करीत आपला विशेष ठसा उमटवला.
सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात राज्य वस्तू व सेवाकर संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद ११० धावा केल्या. त्यांच्याकडून गजेंद्र रामदिन याने ४५ चेंडूंत झटपट ४२ धावांची खेळी केली. राजू मदन याने २३ चेंडूंत २३ धावा केल्या. एन.एच.के.तर्फे अनिल भवर आणि योगेश परदेशी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यासाठी त्यांनी प्रत्येकी १४ धावा मोजल्या. प्रत्युत्तरात एनएचके संघाने विजयी लक्ष्य १३.५ षटकांत पूर्ण केले. त्यांच्याकडून ज्ञानेश्वर वैद्य याने अवघ्या ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांची आक्रमक खेळी केली. सौरभ अलक याने २८ चेंडूंत ३० धावांचे योगदान दिले. राज्य वस्तू व सेवाकर संघाकडून राजू मदन याने २७ धावांत २ गडी बाद केले.
दुसºया सामन्यात कॉस्मो फिल्म संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत सर्वबाद १४४ धावा केल्या. त्यांच्याकडून सचिन चौबे याने ३४ चेंडूंत ५ चौकारांसह ३८ धावा केल्या. विपुल इनामदार याने २७ व गणेश काकडे याने २० धावांचे योगदान दिले. एशियन संघाकडून विजय वालतुरे याने २१ धावांत ४ गडी बाद केले. हर्षवर्धन त्रिभुवन याने २५ धावांत २ बळी घेतले. प्रत्युत्तरात एसियन संघ १४.३ षटकांत ५९ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून रणजित सावेने २० चेंडूंत २ चौकारांसह १८ धावा केल्या. अन्य फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले नाहीत. कॉस्मो फिल्मतर्फे कर्णधार सतीश जामखेडकरने ९ धावांत ३ गडी बाद केले. त्याला विपुल इनामदार व विराज चितळे यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ दिली. विपुलने ६ व विराजने १० धावा मोजल्या.
आज झालेल्या सामन्यात पंच म्हणून राजेश सिद्धेश्वर, महेश जहागीरदार, उदय बक्षी, अॅड. बाळासाहेब वाघमारे आदींनी काम पाहिले. गुणलेखन तन्मय ढगे व राजेश भिंगारे यांनी केले. येत्या १६ मार्च, शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता डीआयएजीईओ व बडवे इंजिनिअरिंग यांच्यात लढत होणार आहे. याच दिवशी दुसरा सामना सकाळी १०.३० वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग व वैद्यकीय ब या संघात रंगणार असल्याचे संयोजक गंगाधर शेवाळे व दामोदर मानकापे यांनी कळवले आहे.