निलंगेकर, चव्हाण यांनी घेतली वायाळ कुटुंबियांची भेट
By Admin | Published: April 15, 2017 11:32 PM2017-04-15T23:32:08+5:302017-04-15T23:34:37+5:30
लातूर :शनिवारी वायाळ कुटुंबियांची पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शासकीय पातळीवरील मदत मिळवून देण्याचे जाहीर केले़
लातूर : तालुक्यातील भिसे वाघोली येथील शेतकरी कन्या शीतल व्यंकट वायाळ (२१) हिने आपल्या विवाहासाठी वडिलांकडे पैसे नसल्याचे पाहून शुक्रवारी आत्महत्या केली. शनिवारी वायाळ कुटुंबियांची पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शासकीय पातळीवरील मदत मिळवून देण्याचे जाहीर केले़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही वायाळ कुटुंबियांची भेट घेऊन एक लाख मदत देण्यात येत असल्याचे सांगितले़
भिसे वाघोली येथील शेतकरी व्यंकट वायाळ यांची मुलगी शीतल वायाळ हिने शुक्रवारी दुपारी स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती़
दरम्यान, शनिवारी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी वायाळ कुटुंबास भेट देऊन चौकशी करण्याबरोबर सांत्वन केले़ यावेळी खा़डॉ़ सुनील गायकवाड, रमेशअप्पा कराड यांची उपस्थिती होती़ शासकीय पातळीवरून मदत मिळवून देण्याचे जाहीर केले़
दरम्यान, आ़ अमित देशमुख यांनी वायाळ कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले़ तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी केली़ लवकरच काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले़ यावेळी आ़त्र्यंबक भिसे, माजी आ़ वैजनाथ शिंदे आदी उपस्थित होते़