औरंगाबादेत मंझाविरोधात आणखी नऊ जणांच्या तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:28 AM2018-02-22T00:28:00+5:302018-02-22T00:28:05+5:30
नोकरीला लावण्याच्या आमिषाने ३ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलसचिव ईश्वर मंझाविरुद्ध आणखी ९ तक्रारी बुधवारी पोलिसांना प्राप्त झाल्या. यावरून आरोपीचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, विटखेडा येथील त्याच्या अलिशान बंगल्याची पोलिसांनी झडती घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नोकरीला लावण्याच्या आमिषाने ३ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उपकुलसचिव ईश्वर मंझाविरुद्ध आणखी ९ तक्रारी बुधवारी पोलिसांना प्राप्त झाल्या. यावरून आरोपीचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, विटखेडा येथील त्याच्या अलिशान बंगल्याची पोलिसांनी झडती घेतली.
देवनाथ माणिकराव चव्हाण (रा. चिकलठाण, ता. कन्नड) यांच्या भावाला विद्यापीठात सहायक कारकून म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेतल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मंझाला मंगळवारी अटक केली. सध्या तो २४ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे. ईश्वर मंझा हा बेरोजगारांना नोकरीला लावण्याच्या आमिषाने गंडवितो, अशा तक्रारींची चर्र्चा विद्यापीठ परिसरात होत असे. फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्यास अटक केल्याचे कळताच बुधवारी आणखी नऊ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेऊन मंझाचे कारनामे सांगितले. यापैकी सहा जणांच्या एका गटाने मध्यस्थांमार्फत आरोपी मंझाला नोकरीसाठी पैसे दिल्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांना सांगितले. ते म्हणाले की, अन्य दोन तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत येऊन मंझाने फसविल्याचे सांगितले. या तक्रारदारांना त्यांच्याकडील कागदपत्रांसह येण्यास सांगण्यात आले आहे. आरोपीचा विटखेडा येथील भूखंड क्रमांक ५० वर अलिशान बंगला आहे. कालच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याच्या बंगल्याची पोलिसांनी झडती घेतली. सुमारे तीन तास चालेल्या या झडतीत विशेष असे काही पोलिसांच्या हाती लागले नाही, असे अधिकाºयांनी सांगितले.