सिल्लोड येथे आगीत नऊ दुकाने जळून खाक; २५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 06:15 PM2021-05-04T18:15:18+5:302021-05-04T18:17:15+5:30
मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान भोकरदन रोडवरील गुजरात ट्रेडिंग कंपनी या दुकानात शॉर्टसर्किट होऊन आग लागली.
सिल्लोड : शहरातील भोकरदन रोडवर शॉर्टसर्किटमुळे नऊ दुकानांना आग लागून दुकाने जळून खाक झाली. मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. यात अंदाजे 25 लाख रुपयांचा नुकसान झाल्याची माहिती दुकानदारांनी दिली.
मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान भोकरदन रोडवरील गुजरात ट्रेडिंग कंपनी या दुकानात शॉर्टसर्किट होऊन आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने बाजूच्या नऊ दुकांनात आग पसरली. नागरिकांनी नगर परिषदला आगीची माहिती दिली. यानंतर नगर परिषदेचे तीन व खाजगी तीन टँकर घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दिड तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली.
या आगीत शेख रजाक शेख सुभान यांचे स्टार वेल्डिंग वर्क शॉप यांचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर शेख उमर यांच्या जनता बकरा मटण शॉप यांचे 10 हजार, शेख कैसर शेख रउफ यांचे भारत फर्निचर 30 हजार,वाजेदखा आलमखा पठाण यांचे रॉयल स्टील फर्निचर 30 हजार,शेख अफसर शेख भिकण यांचे जनता फर्निचर 2 लाख,शेख मननाणं शेख युसूफ यांचे सितारा गैस वेल्डिंग 3 लाख,शेख सोहेल यांचे महाराष्ट्र ऑटो कन्सल्ट, अश्रफ युसुफ कच्ची यांचे गुजरात ट्रेडिंग कंपनी 10 लाख,शेख सादेख यांचे सादेख ऑटो पार्ट्स एन्ड गैरेंज 8 लाख असे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालकांनी दिली.
आग विझविण्यासाठी नागरिकांचे परिश्रम
आग विझविण्यासाठी नगरसेवक रईस मुजावर, शेख फेरोज अकबर, कॉ. सैय्यद अनिस, शेख मुख्तार बबलू, शेख अनिस, शेख याकूब, अस्लम कुरेशी, हाजी कय्युम पठाण, मनोज कोठाले, फहिम पठाण, शेख वहाब, वसीम पठाण, शेख मोईन, शेख युसुफ, फर्मान चौधरी, लुकमान चौधरी, अरुण आरके पांगा, पठाण इम्रान, शेख जावेद, कॉ. जाबेर पठाण, नगर परिषद कर्मचारी अजगर पठाण, अनवर पठाण, शेख अजीम, शेख सलमान, सुधाकर पाथरीकर, जफर पठाण यांनी परिश्रम घेतले.
बघ्यांची मोठी गर्दी
दुकांनाना आग लागल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असल्याने पोलिसांना गर्दी पांगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.