निपट निरंजन महाराजांची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:02 AM2020-12-31T04:02:11+5:302020-12-31T04:02:11+5:30
औरंगाबाद : हनुमान टेकडी परिसरातील सद्गुरू निपट निरंजन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी भरविण्यात येणारी यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात ...
औरंगाबाद : हनुमान टेकडी परिसरातील सद्गुरू निपट निरंजन महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी भरविण्यात येणारी यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आली.
यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत न्यासाचे सचिव विनायक पांडे यांनी सांगितले की, कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे. कुस्तीची स्पर्धा होणार नाही; पण २ जानेवारीपासून समाधी मंदिरात श्रीमद्भागवत कथेचे आयोजन केले आहे. लव्हाळी येथील व्यासपूर आश्रमाचे स्वामी रामेश्वरानंद सरस्वती महाराज सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कथा निरूपण करणार आहेत. ८ जानेवारीला महाप्रसादाने कथेची सांगता होईल. याच दिवशी गुणवंत खेळाडू आणि कोविड योद्ध्यांचा सत्कार केला जाणार आहे.
विशेष म्हणजे यंदापासून दरवर्षी गोरगरीब कुटुंबांतील ११ खेळाडूंना देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षी दत्तक घेतले जाणार आहे. यात ४ क्रिकेटपटू, ३ कुस्तीपटू, २ ॲथलेटिक्स खेळाडू आणि २ बास्केटबॉलपटूंंचा समावेश आहे. या खेळाडूंना क्रीडा साहित्य आणि खुराकाची व्यवस्था वर्षभर न्यासातर्फे केली जाणार असल्याचे पांडे यांनी सांगितले.