औरंगाबाद शहरात शुक्रवार, शनिवारी निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:01 PM2019-06-18T23:01:41+5:302019-06-18T23:02:09+5:30

पावसाळा सुरू झाला तरी शहरात भीषण पाणीटंचाई सुरूच आहे. मृग नक्षत्राचे दोन आठवडे उलटले तरी पावसाचा थांगपत्ता नाही. त्यातच शुक्रवार २१ जून रोजी महापालिकेने पाणीपुरवठ्यात तब्बल १२ तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार शहरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. खंडण काळात जायकवाडी, फारोळा येथे व्यापक प्रमाणात दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

Nirvali on Friday, Saturday in Aurangabad city | औरंगाबाद शहरात शुक्रवार, शनिवारी निर्जळी

औरंगाबाद शहरात शुक्रवार, शनिवारी निर्जळी

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ तासांचे शटडाऊन : मान्सूनपूर्व विविध कामांचा समावेश


औरंगाबाद : पावसाळा सुरू झाला तरी शहरात भीषण पाणीटंचाई सुरूच आहे. मृग नक्षत्राचे दोन आठवडे उलटले तरी पावसाचा थांगपत्ता नाही. त्यातच शुक्रवार २१ जून रोजी महापालिकेने पाणीपुरवठ्यात तब्बल १२ तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार शहरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. खंडण काळात जायकवाडी, फारोळा येथे व्यापक प्रमाणात दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.
जायकवाडी, फारोळा येथे मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी किमान १२ तासांचे शटडाऊन द्यावे, अशी विनंती वीज वितरण कंपनीने महापालिकेकडे एप्रिल महिन्यात केली होती. ऐन उन्हाळ्यात मोठे शटडाऊन घेतल्यास शहरात पाण्यासाठी बरीच ओरड होईल, या भीतीने मनपा प्रशासनाने आजपर्यंत शटडाऊनला परवानगी दिली नव्हती. यंदा पावसाळा लांबला आहे. त्यामुळे २१ जून रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. वीज कंपनी जायकवाडी, फारोळा येथे मनपाला २४ तास वीज देण्यासाठी यंत्रणा उभारणार आहे. येथील ३३ के.व्ही. केंद्राचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. वीज कंपनीच्या खंडण काळात महापालिकाही अनेक कामे करणार आहे. ठिकठिकाणी असलेल्या गळत्या थांबविण्यात येणार आहेत. यंत्र सामुग्रीचीही दुरुस्ती या १२ तासांत होणार आहे. दुरुस्तीचे काम शुक्रवारी रात्री उशिरा संपल्यावर जायकवाडी येथून एकानंतर एक पाण्याचा उपसा करणाऱ्या मोटारी सुरूकरण्यात येतील. शहरात पहाटे पाणी येण्यास सुरुवात होईल. शनिवारी दिवसभर पाण्याच्या टाक्या भरण्यात येतील. शक्य झाल्यास काही वसाहतींना याच दिवशी पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासन करणार असल्याचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी कळविले. रविवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. दोन दिवस औरंगाबादकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: Nirvali on Friday, Saturday in Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.