शोषणात हरवतेय निरागस बालपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:31 AM2017-11-14T00:31:07+5:302017-11-14T00:31:18+5:30

बालकांचे लैंगिक व शारीरिक शोषण ही एक गंभीर सामाजिक समस्या बनत चालली आहे. बालकांच्या आयुष्याशी खेळणारे, त्यांचे शोषण करणारे वाईट वृत्तीचे लोकही समाजात वावरतात. त्यामुळे पालकांनी याबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. चालू वर्षात २०१७ मध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडल्या असून एकूण २५ बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

Nirvana childhood losing in exploitation | शोषणात हरवतेय निरागस बालपण

शोषणात हरवतेय निरागस बालपण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : बालकांचे लैंगिक व शारीरिक शोषण ही एक गंभीर सामाजिक समस्या बनत चालली आहे. बालकांच्या आयुष्याशी खेळणारे, त्यांचे शोषण करणारे वाईट वृत्तीचे लोकही समाजात वावरतात. त्यामुळे पालकांनी याबाबत दक्ष राहणे आवश्यक आहे. चालू वर्षात २०१७ मध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी अत्याचाराच्या घटना घडल्या असून एकूण २५ बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.
लहान मुलांना वासनेचे शिकार बनवून त्यांच्या आयुष्याशी खेळणाºया वाईट वृत्तीच्या लोकांपासून दूर ठेवणे हा पालकांसमोरील गंभीर प्रश्न आहे. समाजातील घडणाºया बाललैगिंंक अत्याचाराच्या घटनांमुळे प्रत्येक आई-वडिलांच्या मनात आपल्या मुलांबद्दल असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे पालकांनी आता जागरूक होण्याची वेळ आली आहे. निरागस बालक अशा घटनांचे शिकार होणार नाहीत. याची घरातील प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेच झाले आहे.
बालमजुरी सामाजिक समस्या
जिल्ह्यात अनेक निरागस बालकांचे हात राबताना दिसत आहेत. मात्र याबाबत प्रशासकीय यंत्रणेकडून ठोस कारवाई केली जात नाही. मागील तीन वर्षांत कामगार कार्यालयातर्फे बालमजुरीविरोधात जिल्ह्यात एकही धाडसत्र झाले नाही. २०१३ नंतर एकही कारवाई करण्यात आली नसल्याने बालमजूरीचे चित्र वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या राबणाºया मुलांना बालदिनी यातून मुक्तता मिळण्याची काही भेट मिळेल काय? हा प्रश्नच आहे.

Web Title: Nirvana childhood losing in exploitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.