अजिंठा ग्रामीण रुग्णालयाची निजामकालीन इमारत टाकणार कात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:04 AM2021-02-26T04:04:47+5:302021-02-26T04:04:47+5:30
सिल्लोड : अजिंठा ग्रामीण रुग्णालयाची निजामकालीन इमारत जीर्ण झाली आहे. ती धोकादायक इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन ...
सिल्लोड : अजिंठा ग्रामीण रुग्णालयाची निजामकालीन इमारत जीर्ण झाली आहे. ती धोकादायक इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी ३ कोटी ३१ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय आराखड्यास सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
अजिंठा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. पाठपुराव्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी ३ कोटी ३१ लाखांच्या अंदाजपत्रकीय आराखड्यास मान्यता दिली असल्याने अजिंठ्यात आता अत्याधुनिक इमारत होणार आहे.
औरंगाबाद-जळगाव महामार्गावर अनेक अपघात होतात. या अपघातातील जखमींना योग्यवेळी उपचार न मिळाल्याने त्यातील अनेक जखमींना प्राणही गमवावे लागतात. अशा जखमींसाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालय फायदेशी ठरणार आहे.
फोटो कॅप्शन :
अजिंठा येथील जीर्ण झालेली ग्रामीण रुग्णालयाची निजामकालीन इमारत.
250221\img-20171222-wa0257_1.jpg
अजिंठा येथील जीर्ण झालेली ग्रामीण रुग्णालयाची निजाम कालीन इमारत.