मनपाचा आता टँकर चालकांवर दबाव
By Admin | Published: March 2, 2016 11:14 PM2016-03-02T23:14:16+5:302016-03-02T23:18:34+5:30
लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतातील पाणीसाठा संपलेला आहे. त्यामुळे विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहण करण्यास प्रारंभ केला असून
लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतातील पाणीसाठा संपलेला आहे. त्यामुळे विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहण करण्यास प्रारंभ केला असून, खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर चालकांवरही मनपाने दबाव वाढविला असून, ६ हजार लिटर्स क्षमतेचे एक टँकर ३५० रुपयाला द्या ते आम्ही शहरातील नागरिकांना मोफत देऊ, असे फर्मान सोडले आहे.
नोंदणीकृत टँकरधारकास एक टँकर पाणी महानगरपालिका सांगेल तेथे मोफत पुरवठा करावा, असा पर्याय निवडला आहे. त्यानुसार काही नोंदणीकृत टँकर चालकांवर यासाठी मनपाने दबाव सुरू केला आहे. ६ हजार लिटर्स क्षमतेचे एक टँकर मनपा सांगेल तिथे पुरवठा करायचा आणि मनपा प्रशासनाकडून ३५० रुपये घ्यायचे, असा हा पर्याय आहे.
टँकरद्वारे पाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सर्व व्यावसायिकांना महानगरपालिकेने नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. काहींची नोंदणी झाली असून, नोंदणी झालेल्यांना या उपक्रमाविषयी कळविण्यात आले आहे. नगरपालिकेत नोंदणीकृत टँकरधारकांकडून ३५० रुपयाला ६ हजार लिटर्स क्षमतेचे पाणी खरेदी करून ज्या भागात तीव्र पाणीटंचाई आहे, त्या भागात ते दिले जाणार आहे. हा उपक्रम गुरुवारपासून राबविला जाणार असल्याचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)