‘एनएमएमएस’ परीक्षेत बाजारसावंगीची जि.प. शाळा जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:04 AM2021-08-01T04:04:07+5:302021-08-01T04:04:07+5:30
बाजारसावंगी : येथील जिल्हा परिषदच्या शाळेतील ६१ पैकी २५ विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी झालेल्या ‘एनएमएमएस’ (नॅशनल मिन्स कम मेरीट ...
बाजारसावंगी : येथील जिल्हा परिषदच्या शाळेतील ६१ पैकी २५ विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी झालेल्या ‘एनएमएमएस’ (नॅशनल मिन्स कम मेरीट स्कॉलरशिप) परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. तर शाळेने जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. या मिळालेल्या यशामुळे ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.
कोरोना महामारीमुळे मागील वर्षी शिक्षणाचा तसा बट्ट्याबोळ झाला. अनंत अडचणीवर मात करून शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकविले. विद्यार्थी शाळेत येऊ शकत नव्हते. अनेक समस्यांवर मात करून बाजारसावंगी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी ऑनलाईन सराव घेऊन शेतकऱ्यांच्या मुलांची गुुणवत्ता विकसित केली. नॅशनल मिन्स कम मेरीट स्काॅलरशिप अर्थात एनएमएमएस या परीक्षेत ६१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. योग्य नियोजन, सातत्याने घेतल्या गेलेल्या सरावामुळे येथील शाळेतील तब्बल २५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहेत. परीक्षेचा निकाल जिल्ह्यातून प्रथम आला आहे.
----
शिक्षणाधिकाऱ्यांनी केले कौतुक
मिळालेल्या या यशाबद्दल शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण, गट शिक्षणाधिकारी सोळंके, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख यांनी शाळेची प्रत्यक्ष भेट घेऊन शिक्षकांसह यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक --------- सेवानिवृत्त मुख्याध्यापक........ यांचा मोलाचा वाटा आहे.
310721\1535-img-20210731-wa0042.jpg
बाजारसावंगी येथील जिल्हापरिषद प्रशाला