कचनेर येथील उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:02 AM2021-09-22T04:02:07+5:302021-09-22T04:02:07+5:30

काही ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच मुकेश चव्हाण यांचेवर अविश्वास प्रस्ताव तहसीलदारांकडे दाखल केला होता. त्यानुषंगाने औरंगाबादच्या तहसीलदार ज्योती पवार यांच्या ...

No-confidence motion passed on sub-panch at Kachner | कचनेर येथील उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

कचनेर येथील उपसरपंचावर अविश्वास ठराव मंजूर

googlenewsNext

काही ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच मुकेश चव्हाण यांचेवर अविश्वास प्रस्ताव तहसीलदारांकडे दाखल केला होता. त्यानुषंगाने औरंगाबादच्या तहसीलदार ज्योती पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी सरपंच कमल फतपुरे, मंडळ अधिकारी किशोर वाघ, ग्रामविकास अधिकारी ए. एस. गाडेकर, तलाठी उबाळे उपस्थित होते. ग्रामपंचायतमधील ११ सदस्यांपैकी यावेळी सदस्य विनोद जाधव, जवाहरलाल राठोड, मनीषा राठोड, सुशीला राठोड, द्वारकाबाई भानुसे, इंदूबाई काकडे, शकुंतला जाधव, कमल फतपुरे हे ८ सदस्य उपस्थित होते. तर तीन सदस्य अनुपस्थित होते. यावेळी बहुमताने उपसरपंच मुकेश चव्हाण यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सपोनि. गजानन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सोपान डकले, बीट जमादार ज्ञानेश्वर करांगळे, प्रकाश शिंदे यांनी चोख बंदोबस्त लावला होता. तंटामुक्ती अध्यक्ष रमेश जाधव, अलीम पठाण, पांडू जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: No-confidence motion passed on sub-panch at Kachner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.