वीज ना पाणी तरीही तीस वर्षांपासून मुक्कामी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:05 AM2021-06-04T04:05:32+5:302021-06-04T04:05:32+5:30

सिल्लोड : मागील तीस वर्षांपासून विजेअभावी घरात अंधार, पाण्यासाठी अनवाणी भटकंती, रेशन कार्ड नसल्याने घरोघरी मागावी लागत असलेली भिक्षा, ...

No electricity or water for 30 years! | वीज ना पाणी तरीही तीस वर्षांपासून मुक्कामी !

वीज ना पाणी तरीही तीस वर्षांपासून मुक्कामी !

googlenewsNext

सिल्लोड : मागील तीस वर्षांपासून विजेअभावी घरात अंधार, पाण्यासाठी अनवाणी भटकंती, रेशन कार्ड नसल्याने घरोघरी मागावी लागत असलेली भिक्षा, अंधारात सर्पदंश होऊन मुलाचा झालेला मृत्यू, परिसरातील अस्वच्छतेमुळे कायमचेच आजारीपण. या समस्या कुणा जंगालातील वा दुर्गम भागातील नाही, तर जगप्रसिद्ध अजिंठा गावापासून दोन किलोमीटर अतंरावर असणाऱ्या अनाड गावातील बरड वस्तीतील आहे.

निवडणूक आली की वस्तीवरील नागरिकांना फक्त आश्वासने देऊन मतांसाठी वापर केला जातो. मात्र, निवडणुकीनंतर कुणीही वस्तीच्या समस्या निवारणासाठी पुढे येत नसल्यानेच तीस वर्षांपासून समस्या कायमच आहेत. बरड वस्तीवर सर्वाधिक भटका जोशी समाज राहत असून सदर जागा तहसीलच्या मालकीची आहे. राहत असलेली तीस कुटुंबे ही बाहेरगावाहून निर्वासित म्हणून आलेली आहेत. त्यांनी अतिक्रमण केले असून त्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा मिळू नये, असा चंग गावातील काही राजकीय मंडळींनी बांधला आहे. जातीय व राजकीय आकसापोटी ग्रामपंचायतीने बरड वस्तीच्या समस्यांकडे वर्षानुवर्षे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

अंधारमय वस्ती, सर्पदंशाने दोन जणांचा बळी

बरड वस्तीवरील नागरिकांसाठी वीज हे एक मृगजळच ठरले आहे. अंधारमय वस्तीत रात्रीच्या वेळी सर्पदंश होऊन दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अस्वच्छेतेमुळे डासांचे प्रमाण वाढून डेंग्यूची लागण होऊन एका मुलाचा मृत्यू झाला. वस्तीपासून काही अंतरावर असलेले अनाड गाव लख्ख उजेडात दिसते. पिण्याच्या पाण्यासाठी महिला व मुलांना शेतवस्तीवरील विहिरीवर अनवाणी पायपीट करावी लागते. येथील बहुतांश नागरिकांकडे रेशन कार्ड नाही. कोरोना काळातही धान्य मिळाले नाही. तर कोरोनामु‌ळे गावकऱ्यांनीही त्यांना भिक्षा देणे बंद केले आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न रेशन कार्डअभावी आजही कायमच आहे.

---

गावातील तरुणांनी घेतला पुढाकार

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रथमच तरुणांनी सहभाग घेतला. यात निवडून आलेले गजानन गदाई, मनीषा मानकर, संदीप मानकर, भटका जोशी समाज संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विष्णू मुके, बाबासाहेब गोंडे यांनी वस्तीवरील नागरिकांना सुविधा मिळाव्या म्हणून शासनस्तरावर लढा सुरू केला आहे.

----

फोटो : बरड वस्तीवरील एक कुटुंब.

030621\img_20210603_200609_403_1.jpg

बरड वस्तीवरील एक कुटुंब

Web Title: No electricity or water for 30 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.