नेत्यांची गोची; फुलंब्री तालुक्यातील गावांमध्ये मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना'नो-इंट्री'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 07:15 PM2023-10-20T19:15:30+5:302023-10-20T19:19:50+5:30
मतदानावर बहिष्काराचा ही निर्णय या गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे
फुलंब्री : तालुक्यातील तब्बल सतरा गावांतील ग्रामस्थांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकत पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे.या निर्णयाने नेत्यांसमोर अडचणी वाढल्या असून त्यांची गोची झाली आहे.
आरक्षणा संदर्भात तालुक्यातील मराठा समाज एकजूट झालेला दिसत येत आहे. शुक्रवारपर्यंत तालुक्यातील सतरा गावांतील ग्रामस्थांनी एकमुखीने निर्णय घेत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत येणाऱ्या सर्वच मतदानावर बहिष्कार, तसेच गावात पुढाऱ्यांना येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला. तसे पत्रच ११ ग्रामपंचायतने तहसीलदार आणि पोलिसांना दिले दिले आहे. गावकऱ्यांच्या या निर्णयाने पुढाऱ्यांमध्ये धाकधूक वाढली असून मोठी गोची निर्माण झाली आहे.
पुढाऱ्यांना गावबंदी केलेली गावे:
आडगाव खुर्द, धानोरा, कोलते टाकळी, गणोरी, जातेगाव, चिंचोली नकीब, नायगाव , निधोना, शेलगाव खु,, बाभूळगाव खुर्द, वाहेगाव, साताळा, किनगाव , हिवरा, आळंद , सांजूळ, जातवा.