पिशोर ग्रामपंचायतीत कुणालाही बहुमत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:06 AM2021-01-19T04:06:11+5:302021-01-19T04:06:11+5:30

सहा प्रभागांच्या एकूण सतरा जागांसाठी पाच पॅनलचे ८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. हर्षवर्धन जाधव समर्थक कै. रायभानजी जाधव ...

No one has majority in Pishore Gram Panchayat! | पिशोर ग्रामपंचायतीत कुणालाही बहुमत नाही !

पिशोर ग्रामपंचायतीत कुणालाही बहुमत नाही !

googlenewsNext

सहा प्रभागांच्या एकूण सतरा जागांसाठी पाच पॅनलचे ८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. हर्षवर्धन जाधव समर्थक कै. रायभानजी जाधव ग्राम विकास पॅनलला चार, संजना जाधव समर्थक ग्रामविकास पॅनलला दोन, माजी सरपंच पुंडलिक डहाके यांच्या शिवशाही ग्राम विकास पॅनलला सात, राजेंद्र मोकासे व माजी उपसरपंच नारायण जाधव यांच्या आदर्श परिवर्तन ग्रामविकास पॅनलला तीन व एक अपक्ष उमेदवार निवडून आले. निवडणुकीपूर्वी सत्ता ताब्यात असणाऱ्या माजी सरपंच नारायण मोकासे यांच्या लोकशक्ती ग्रामविकास पॅनलला यावेळी खातेसुद्धा उघडता आले नाही. बहुमताचा जादुई नऊ हा आकडा मात्र कोणत्याही पॅनलला गाठता आला नाही.

आईविरूद्ध मुलाच्या पॅनलमध्ये मारली मुलाने बाजी

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजनाताई जाधव आणि श्री. दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे पॅनल समोरासमोर असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या ग्रामपंचायतीकडे वेधले गेले होते. यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या रायभानजी जाधव ग्रामविकास पॅनलने चार जागा, तर संजनाताई समर्थक पॅनलला दोन जागा मिळाल्या. एकंदरीत मुलाने चार विरूद्ध दोन फरकाने या लढाईत बाजी मारल्याचे म्हणता येईल.

या निवडणुकीत आजी-माजी सरपंच, आजी-माजी उपसरपंच यांचे पराभव हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले.

Web Title: No one has majority in Pishore Gram Panchayat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.