'कोणी गुलालही लावणार नाही,अन्...'; भुजबळांच्या गोळी मारणार विधानाचा जरांगेंकडून समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 06:30 PM2023-12-13T18:30:47+5:302023-12-13T18:33:47+5:30

आम्ही कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही पण तुम्हाला आता सुट्टी नाही.

'No one will even plant gulal, and..'; manoj Jarange critisize chhagan Bhujbal on shooting thread | 'कोणी गुलालही लावणार नाही,अन्...'; भुजबळांच्या गोळी मारणार विधानाचा जरांगेंकडून समाचार

'कोणी गुलालही लावणार नाही,अन्...'; भुजबळांच्या गोळी मारणार विधानाचा जरांगेंकडून समाचार

- अमेय पाठक 

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यातील वाद वाढतच जात आहेत. दरम्यान, मंत्री भुजबळ यांनी मला गोळी मारणार असल्याची शक्यता वर्तवली. या विधानाचा जरांगे यांनी समाचार घेतला असून, ' तुम्हाला कोणी गुलालही लावणार नाही, अन् तुम्ही गोळी मारण्याचे बोलता.' अशी टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना जरांगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. 
  
जरांगे पुढे म्हणाले, मराठ्याबद्दल राग, विषारी भाषा बोलू नका, तुमच्या विरोधात आयुष्यभर बोलत राहणार. आम्ही कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही पण तुम्हाला आता सुट्टी नाही. हे विनाकारण धमकावत आहेत, असा आरोपही जरांगे यांनी यावेळी केला.  सरकारने जेव्हा स्टेटमेंट बदलायला सुरुवात केली. तेव्हा एका व्यक्तीसाठी हे आम्हाला फसवायला लागले हे आमच्या लक्षात आले आहे. जर आरक्षण दिलं नाही तर ६ कोटी जनतेच्या दारात उभं राहायचं नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.

तसेच समाजाला १७ डिसेंबरला आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलवलेलं असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. या बैठकीला साहित्यिक, अभ्यासक, मराठा समाजाची उपस्थिती असेल. सकाळी ९ ते संध्याकाळी ६पर्यत ही बैठक होईल. यात पुढील आंदोलन कसं करायचं हे ठरवू, असेही जरांगे यांनी जाहीर केले. जी दिशा यात ठरेल ती फायनल असेल.पण शांततेत आंदोलन होईल. फक्त सरकारने आमच्या मागणीवर गंभीरपणे विचार करावा, अन्यथा त्यांना हे आंदोलन अवघड जाईल, असा इशारा जरांगे यांनी दिला.

भुजबळ यांना बळ देऊ नका 
छगन भुजबळ हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. ते बोलत असल्यानेच गावांगावांत जातीय तणाव निर्माण होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. बीडची दंगल यांनीच घडवून आणली असून त्यांना बळ देऊ नका, असे सरकारला आवाहनही जरांगे यांनी केले. भुजबळ यांचे ऐकून मराठ्यांच वाटोळं करू नका. यांनी महाराष्ट्र्र सदन खाल्लं तरी याची केस तुम्ही मागे घ्यायला लागलेत. सगळा महाराष्ट्र याने खाल्ला, तरीही फडणवीस साहेब याला बळ द्यायला लागले असं दिसतं आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला. आम्ही शांततेच आवाहन करतो आणि हे लोकांना भडकवतात. तुम्ही जर असंच करत राहिले तर आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.

फडणवीस यांना इशारा
आम्हाला आश्वासन देण्यासाठी तिन्ही गटाचे लोक होते. आमच्याकडे सगळे कागदांचे फोटो आणि व्हिडीओ आहेत. एक महिन्यात गुन्हे मागे घेऊ असं सांगितलं, अटक करणार नाही असं सांगितलं, असताना या भुजबळच ऐकून निष्पाप पोर राज्यभर अटक केले. भुजबळ बोलत असल्यापासून फडणवीस  लक्ष देत नाहीत. बच्चू कडू याला साक्षीदार आहेत. फडणवीस साहेब तुमच्या बद्दल मराठ्यांमध्ये नाराजी पसरवू देऊ नका, अन्यथा तुम्हाला प्रचंड जड जाईल. मराठ्यांचा रोष घ्यावा लागेल, असेही जरांगे म्हणाले.

Web Title: 'No one will even plant gulal, and..'; manoj Jarange critisize chhagan Bhujbal on shooting thread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.