एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही : अंजली आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 07:39 PM2020-02-26T19:39:35+5:302020-02-26T19:41:26+5:30

रिपब्लिकन पक्षांनी भूमिका स्पष्ट केल्यास चर्चा 

No proposal to lead with MIM: Anjali Ambedkar | एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही : अंजली आंबेडकर

एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाच प्रस्ताव नाही : अंजली आंबेडकर

googlenewsNext

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचीऔरंगाबादेत मोठी ताकद आहे. त्यामुळे पक्षाला मनपा निवडणुकीत चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे; पण एमआयएमबरोबर आघाडी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, तसेच सीएए, एनआरसी व एनपीआरच्या मुद्यांवर रिपब्लिकन पक्षाच्या गटांनी जर भूमिका स्पष्ट केल्या, तर त्यांनाही सोबत घेता येऊ शकेल, असे आज येथे पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी जाहीर केले.

मनपा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडी व एमआयएम एकत्रित येण्यावरून सध्या उलटसुलट चर्चा आहे. त्याअनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अंजली आंबेडकर व वंबआच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले की, सर्वच्या सर्व जागा लढण्यासंबंधी व आघाडी करण्यासंबंधी कुठलाच निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र, निरीक्षकांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, त्या माध्यमातून मुलाखती वगैरे प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 

खैरलांजी प्रकरण घडले. त्यावेळीही राष्ट्रवादीचे आर.आर. पाटील गृहमंत्री होते. आताही गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे आणि सध्याच्या गृहमंत्र्यांनी सिल्लोड- अंधारी प्रकरण घडल्यानंतर जे वक्तव्य केले, त्यावरून पीडितेला न्याय मिळेल, असे वाटत नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. 
एमआयएमबरोबर आघाडी होईल की नाही; परंतु रिपब्लिकन गटांबरोबर आघाडी होऊ शकणार नाही, काल असे विचारता अंजली आंबेडकर उद्गारल्या, कुठल्या गटाबरोबर. सीएए, एनआरसी व एनपीआर या मुद्यांवर या गटांनी आपली भूमिका जाहीर केली पाहिजे. 

रिपाइं एचे रामदास आठवले हे भाजपबरोबर केंद्रात सत्तेवर आहेत.  त्यामुळे अंजली आंबेडकर यांनी कुठल्या गटाबरोबर, असे विचारून आठवले यांनाच टोला मारला. यावेळी वंबआ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. लता बामणे, प्रा. प्रज्ञा साळवे, देवशाला गवांदे आदींची उपस्थिती होती.

Web Title: No proposal to lead with MIM: Anjali Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.