मराठा समाजाला आरक्षण नाही तर मतदान नाही; मुर्शिदाबादवाडी ग्रामसभेत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 07:32 PM2023-09-04T19:32:03+5:302023-09-04T19:32:14+5:30

मुर्शिदाबादवाडी येथील लोकसंख्या दोन हजार तर मतदान ११०० आहे.

No reservation for the Maratha community, no voting; Decision in Murshidabadwadi Gram Sabha | मराठा समाजाला आरक्षण नाही तर मतदान नाही; मुर्शिदाबादवाडी ग्रामसभेत निर्णय

मराठा समाजाला आरक्षण नाही तर मतदान नाही; मुर्शिदाबादवाडी ग्रामसभेत निर्णय

googlenewsNext

फुलंबी : तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथील ग्रामस्थांनी तातडीची ग्रामसभा बोलावून मराठा समजला आरक्षण मिळत नाही तो पर्यन्त मतदान करणार नाही असा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून या संदर्भात सोमवारी तहसीलदार यांना ग्रामसभेचा ठराव देऊन निवेदन देण्यात आले आहे आरक्षण साठी अशा प्रकारचा निर्णय घेणारी पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

तालुक्यातील मुर्शिदाबादवाडी येथील लोकसंख्या दोन हजार तर मतदान ११०० आहे. जालना येथील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला यांचा सर्वत्र निषेध होत असताना मुर्शिदाबादवाडी ग्रामस्थांनी सोमवारी तातडीने ग्रामसभा बोलावली व मराठा समजावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध केला. तसेच मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत आगामी सर्व निवडणुकींत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सार्वमताने मंजूर केला. 

यावेळी येणाऱ्या १५ दिवसात आरक्षण लागू ना झाल्यास आम्ही गावकरी मारोती मंदिर परिसर मुर्शिदाबादवाडी येथे बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय ही घेण्यात आला. या संदर्भात गावकऱ्यांनी सोमवारी तहसीलदार डॉ कृष्णा कानगुले यांची भेट घेऊन त्यांना ग्रामसभेच्या सभेच्या ठरावाची प्रत व सोबत निवेदन दिले या प्रसंगी जगन्नाथ पवार , संजय पवार, संजय विटेकर, दिगंबर पवार , सुदाम  विटेकर ,ज्ञानेश्वर पवार , रंगनाथ भोसले , जालिंदर पवार, रमेश पवार हे होते.

Web Title: No reservation for the Maratha community, no voting; Decision in Murshidabadwadi Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.