संसर्गाचा धोकाच नको, औरंगाबादेत रोज १८४ जणांच्या घरासमोर नवीन वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 06:23 PM2021-12-23T18:23:06+5:302021-12-23T18:23:40+5:30

हक्काच्या वाहनाने प्रवासावर भर : नोव्हेंबरमध्ये आली सर्वाधिक नवीन वाहने रस्त्यावर

No risk of infection, new vehicles in front of the houses of 184 people every day in Aurangabad | संसर्गाचा धोकाच नको, औरंगाबादेत रोज १८४ जणांच्या घरासमोर नवीन वाहने

संसर्गाचा धोकाच नको, औरंगाबादेत रोज १८४ जणांच्या घरासमोर नवीन वाहने

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरात दररोज १८४ जणांच्या घरासमोर दुचाकी, चारचाकी वाहने उभी राहात आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे गरजेचे झाले असून, त्यासाठी सार्वजनिक वाहनाऐवजी स्वत:चे वाहन वापरण्यावर भर दिला जात आहे. त्याबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळेही अनेकांची पावले नव्या वाहनांकडे वळली आहेत. त्यामुळेच वर्षभरात नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक नवीन वाहने रस्त्यावर आली.

जिल्ह्यात १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या ३३३ दिवसांत ६१ हजार नव्या वाहनांची विक्री झाली. कोरोनामुळे गर्दी टाळा, सोशल डिस्टन्स पाळा, असे आवाहन करण्यात येत आहे. याचा परिणाम म्हणून नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त पूर्वी एसटी, सिटी बसने प्रवास करणाऱ्या अनेकांनी स्वत:चे वाहन घेतले आहे. त्यातही गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेड्यापाड्यातून रोज ये-जा करणाऱ्यांकडून मनमानी भाडे आकारून खासगी वाहनधारक अक्षरश: लूट करीत आहेत. यामुळेही अनेकांनी स्वत:ची दुचाकी, चारचाकी घेऊन कायमस्वरुपी प्रवासाची व्यवस्था करून घेतली. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये इतर महिन्यांच्या तुलनेत अधिक वाहनांची विक्री झाली आहे.
 

दुचाकीचे सर्वाधिक प्रमाण
एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान ३० हजार ६६० दुचाकींची विक्री झाली, तर याच कालावधीत ५ हजार ७१२ नवीन चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली. त्याबरोबर ५५ टुरिस्ट कॅब, १६३ रिक्षा, १६ मिनी बससह इतर वाहनांचीही भर पडली. गेल्या ११ महिन्यांत नोव्हेंबरध्ये सर्वाधिक ८ हजार ३६ वाहनांची आरटीओ कार्यालयात नोंद झाली.

जिल्ह्यातील वाहनांची स्थिती
- ११ महिन्यांत वाढलेली नवीन वाहने-६१,३८०
-जिल्ह्यातील एकूण वाहने - १५,६४,११९

जानेवारी-७०५४
फेब्रुवारी-६१७३
मार्च-६५६४
एप्रिल-२०८७
मे-९९५
जून-५३९५
जुलै-६९५९
ऑगस्ट-५८८८
सप्टेंबर-४६६८
ऑक्टोबर-७५६१
नोव्हेंबर-८०३६

Web Title: No risk of infection, new vehicles in front of the houses of 184 people every day in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.