पगार नसल्याने शिक्षकाने पैशांसाठी डमी बसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 04:34 AM2018-03-12T04:34:08+5:302018-03-12T04:34:22+5:30
विनाअनुदानित शाळेवर असल्याने पगार मिळत नाही, म्हणून काही तरी करावे, असे सुचले. ओळखीच्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून हे गैरकाम करुन घेतले, आता मात्र पश्चाताप होतोय, अशी कबुली अजिंठा येथील बारावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थी बसविणाºया शिक्षकाने पोलिसांना दिली.
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड (जि. औरंगाबाद) - विनाअनुदानित शाळेवर असल्याने पगार मिळत नाही, म्हणून काही तरी करावे, असे सुचले. ओळखीच्या विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून हे गैरकाम करुन घेतले, आता मात्र पश्चाताप होतोय, अशी कबुली अजिंठा येथील बारावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थी बसविणाºया शिक्षकाने पोलिसांना दिली.
अजिंठा येथील नेहरू मेमोरियल उर्दू शाळेत २६ फेब्रुवारीला हॉल तिकीटमध्ये बदल करून तोतया विद्यार्थी बसवून परीक्षा देण्यास लावणाºया रॅकेटचा मुख्य सूत्रधार धनराज संपत मेढे याला अजिंठा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने त्यास ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली.
धनराज मेढे हा वाकडी, (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील गरुड माध्यमिक विद्यालयात विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षक आहे. ओळखीच्या जामनेर तालुक्यातील पण मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या ७ विद्यार्थ्यांना पास करुन देण्यासाठी ‘सौदा’ ठरला होता.
माझ्या हातात केवळ एकाच विद्यार्थ्याचे एकच हजार रुपये मिळत होते. बाकी वाटण्यात जात होते. यात अजून मोठे मासे आहेत, असे मेढे याने लोकमतला सांगितले. मुंबई येथील ७ विद्यार्थी फरार आहेत.