परदेशात लायसन्सची मुदत संपली तरी ‘नो टेन्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:02 AM2021-08-27T04:02:07+5:302021-08-27T04:02:07+5:30

संतोष हिरेमठ औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत (वैधता) ही केवळ एक वर्षाची असते. परदेशात गेल्यानंतर या लायसन्सची मुदत ...

'No tension' even if the license expires abroad | परदेशात लायसन्सची मुदत संपली तरी ‘नो टेन्शन’

परदेशात लायसन्सची मुदत संपली तरी ‘नो टेन्शन’

googlenewsNext

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत (वैधता) ही केवळ एक वर्षाची असते. परदेशात गेल्यानंतर या लायसन्सची मुदत जरी संपली तरी चिंता करण्याचे कारण नाही. कारण, आता त्या- त्या देशातील भारतीय दूतावासात आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करता येणार आहे. त्यामुळे परदेशात असताना या लायसन्सची मुदत संपली, तर टेन्शन घेण्याची आता गरजच नाही.

परदेशात जाणाऱ्या नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट (आयडीपी) म्हणजेच आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. त्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करावा लागतो. दरवर्षी औरंगाबादेत किमान २०० वाहनचालक आंतरराष्ट्रीय लायसन्स काढत असत; परंतु कोरोना काळात हे लायसन्स काढणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. कारण, अनेक दिवस निर्बंध होते. आताही अनेक जण कोरोनामुळे परदेशातील प्रवासाचे नियोजन पुढे ढकलत आहेत. गतवर्षी हे लायसन्स काढणाऱ्यांत तब्बल ७४ टक्क्यांनी घट होती. फक्त ५९ जणांनी हे लायसन्स काढले.

-------

कोरोना काळात संख्या घटली

२०१७- १६९

२०१८- २०३

२०१९- २१६

२०२०- ५९

२०२१- ३१

------

...असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना

१. आंतरराष्ट्रीय लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करावा लागतो.

२. अर्जासोबत पासपोर्ट, व्हिसा यासह येथील लायसन्सची प्रत असणे आवश्यक असते.

३. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रही जोडावे लागते.

४. यासाठी एक हजार रुपये शुल्क आहे. आरटीओ कार्यालयाकडून आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय लायसन्स दिले जाते.

-----

कोण काढतो हा वाहन परवाना

-नोकरी, शिक्षणासाठी दरवर्षी अनेक औरंगाबादकर परदेशात जातात. परदेशात जाण्यापूर्वी बहुतांश जण आरटीओ कार्यालयातून आवर्जून आंतरराष्ट्रीय लायसन्स काढतात.

- परदेशात विनालायसन्स वाहन चालविल्यास दंड तर होतोच; पण शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे हे लायन्सस काढण्यास प्राधान्य दिले जाते.

- भारतीयांना परदेशात वाहन भाड्याने घेण्यास आणि चालविण्यास आंतरराष्ट्रीय लायसन्समुळे मदत होते. त्यामुळे लायन्सस काढले जाते.

----

ऑनलाइनमुळे शक्य झाले

आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी एक वर्षाची मुदत दिली जाते. पूर्वी ऑनलाइन सुविधा नव्हती; परंतु ऑनलाइन सुविधेमुळे आता भारतीय दूतावासात परवान्याचे नूतनीकरण करता येणार आहे.

-संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: 'No tension' even if the license expires abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.