फीसचे ‘नो टेन्शन’, स्पेशालिस्ट डाॅक्टर तपासणार अगदी मोफत
By संतोष हिरेमठ | Published: August 17, 2023 07:46 PM2023-08-17T19:46:11+5:302023-08-17T19:46:26+5:30
आयएमए स्पेशलिस्ट फ्री ओपीडीचे लोकार्पण; जाणून घ्या कोणत्या दिवशी, कोणते डाॅक्टर ?
छत्रपती संभाजीनगर : वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे कोषाध्यक्ष व इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांच्या हस्ते मंगळवारी समर्थनगर येथील आयएमए हाॅलमधील ‘स्पेशालिस्ट फ्री ओपीडी’चे उद्घाटन करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यास ‘आयएमए’ छत्रपती संभाजीनगर शाखेचे अध्यक्ष डॉ. यशवंत गाडे, सचिव डॉ. अनुपम टाकळकर, डाॅ. उज्ज्वला दहिफळे, डॉ. रवींद्र झंवर, डॉ. उज्ज्वला झंवर, डॉ. दत्ता कदम, डॉ. अनंत कडेठाणकर आदी उपस्थित होते. १८ ऑगस्टपासून प्रत्यक्ष रुग्ण तपासणी सुरू होईल, अशी माहिती ‘आयएमए’तर्फे देण्यात आली.
कोणत्या दिवशी, कोणते डाॅक्टर ?
-सोमवार : डॉ. दत्ता कदम, (बालरोगतज्ज्ञ), डॉ. आशिष मोहिदे,( मानसोपचार तज्ज्ञ)
-मंगळवार : डॉ. रवींद्र झंवर (अस्थिरोगतज्ज्ञ), डॉ. अर्चना सिरसीकर (फॅमिली डॉक्टर)
-बुधवार : डॉ. रमेश रोहिवाल, (कान, नाक, घसातज्ज्ञ), डॉ. इशरत बारूदवाला (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ . राजेंद्र शेवाळे (अस्थिरोगतज्ज्ञ)
-गुरुवार : डॉ. उज्ज्वला झंवर (फिजिशियन), डॉ. अर्चना साने (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. संजय खंडागळे (शल्यचिकित्सक)
आणि डॉ. केदार साने (शल्यचिकित्सक)
-शुक्रवार : डॉ. यशवंत गाडे (अस्थिरोगतज्ज्ञ), डॉ. स्वाती शिंदे (नेत्ररोगतज्ज्ञ), डॉ. अनुपम टाकळकर (त्वचारोगतज्ज्ञ), डॉ. आसावरी टाकळकर (त्वचारोगतज्ज्ञ )
- शनिवार : डॉ. अरविंद राजगुरे (वेदना निवारणतज्ज्ञ), डॉ. किशोर केळे (कान, नाक,घासतज्ज्ञ), डॉ. योगेश लक्कास (फिजिशियन), डॉ. संभाजी चिंतले (कान नाक घसा)
वैद्यकीय सेवेची वेळ काय?
नियोजित वारी दुपारी चार ते सहा या वेळेत आयएमए हॉल येथे स्पेशालिस्ट डाॅक्टर मोफत सेवा देतील.