लसीचे बंधन नको, पूर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा; विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 08:04 PM2022-04-20T20:04:08+5:302022-04-20T20:04:31+5:30

जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण करावा लागेल अभ्यासक्रम 

No vaccine binding, start classes at full capacity; Instructions to university colleges | लसीचे बंधन नको, पूर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा; विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश

लसीचे बंधन नको, पूर्ण क्षमतेने वर्ग सुरू करा; विद्यापीठाचे महाविद्यालयांना निर्देश

googlenewsNext

औरंगाबाद : आता वरिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन वर्ग न घेता जूनच्या मध्यापर्यंत ऑफलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. लसीचे दोन डोस बंधनकारक करणारी अट विद्यापीठाने मागे घेतली आहे. त्यामुळे डोस न घेतलेल्या किंवा एक डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची मुभा मिळणार आहे.

कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून उच्चशिक्षण विभागाने १८ वर्षावरील विद्यार्थ्यांना लसीचे दोन डोस सक्तीचे केले होते. दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिले जात नव्हते. त्यामुळे ऑक्टोबर २०२१ पासून महाविद्यालये उघडली असली, तरी वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी नगण्य होती. अनेक विद्यार्थ्यांनी लस घेतलेली नाही. काहींनी लसीचा एक डोस घेतला आहे. दुसऱ्या डोससाठी त्यांना ८४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ऑफलाइन पद्धतीने वर्ग सुरू केले तरीही महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. अलीकडे काही दिवसांपूर्वी शासनाने कोरोनाबाबतचे पूर्ण निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे विद्यापीठानेही आता वर्गात बसण्यासाठी लसीचे प्रमाणपत्र तपासण्याची अट रद्द केली आहे.

जूनच्या शेवटच्या आठवड्यात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चालू शैक्षणिक वर्षाच्या उन्हाळी सत्र परीक्षांना सुरुवात होणार आहे. जुल्ले अखेरपर्यंत या परीक्षा चालणार आहेत. ३१ जुलै ही चालू शैक्षणिक वर्षाचा शेवटचा दिवस असणार आहे. १ ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष आणि नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयांमध्ये जाऊन अध्ययन करावे लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने हा निर्णय घेतला असल्याचे प्रशासकीय सूत्राने सांगितले.

महाविद्यालयांची कसोटी
विद्यापीठाने ४०० महाविद्यालयांचे शैक्षणिक लेखापरीक्षण (अकॅडेमिक ऑडिट) केले असून त्यापैकी १०० महाविद्यालयांना ‘नो ग्रेड’ मिळाला आहे. त्यामुळे अशा महाविद्यालयांना यापुढे शासकीय सुविधा मिळणार नाहीत तसेच त्यांना पुढील वर्षासाठी संलग्नीकरणही मिळणार नाही. त्यांनी लवकरात लवकर ‘ग्रेड’साठी आवश्यक पायाभूत सुविधा, संशोधनाबाबतचे कार्य हाती घेण्याची संधी देण्यात आली आहे.

Web Title: No vaccine binding, start classes at full capacity; Instructions to university colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.