युद्ध नको, बुद्ध हवा : बुद्धांच्या जयंतीनिमित्त पाली भाषा संवर्धनाचा संकल्प

By विजय सरवदे | Published: May 5, 2023 08:43 PM2023-05-05T20:43:05+5:302023-05-05T20:43:17+5:30

‘बुद्धं, शरणं, गच्छामी’ या स्वरांनी वातावरण मंगलमय

No War, Want Buddha: Pali language conservation resolution on the occasion of Buddha's birth anniversary | युद्ध नको, बुद्ध हवा : बुद्धांच्या जयंतीनिमित्त पाली भाषा संवर्धनाचा संकल्प

युद्ध नको, बुद्ध हवा : बुद्धांच्या जयंतीनिमित्त पाली भाषा संवर्धनाचा संकल्प

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जगाला दया, क्षमा, शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त शुक्रवारी पूजापाठ, बुद्धवंदना, परित्रणपाठ, धम्मदेसना आणि मिरवणुका, या मंगलमय वातावरणाने संपूर्ण शहर न्हाऊन निघाले. पहाटेपासूनच ‘बुद्धं, शरणं, गच्छामी’ हा मंगल ध्वनी कानावर पडताच तथागतांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी उपासक- उपासिकांची पावले विहारांकडे वळाली. विशेष म्हणजे, या दिवशी सर्वांनीच पाली भाषा संवर्धनाचा संकल्प केला.

क्रांतिचौकातून धम्म मिरवणूक

भिक्खू संघाच्या वतीने सकाळी ८.३० वाजता क्रांतीचौक येथे बुद्ध मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर सजविलेल्या रथातून बुद्ध मूर्तीच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. या मिरवणुकीत भदन्त बोधिपालो महाथेरो, भदन्त डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, भन्ते नागसेन थेरो, भन्ते ज्ञानरक्षित थेरो, भन्ते करुणानंद थेरो, भन्ते धम्मज्योती थेरो, भन्ते धम्मबोधी थेरो, भन्ते एन. धम्मानंद व भिक्खू संघ, श्रामणेर संघ, डॉ. हृषिकेश कांबळे, अशोक येरेकर, जालिंदर शेंडगे यांच्यासह उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. भडकल गेटजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या धम्म मिरवणुकीची सांगता झाली.

पोलिस आयुक्तालयात भिक्खू संघाचे भोजनदान आटोपल्यानंतर ही रॅली नागसेनवनात गेली. तिथे बोधीवृक्षाखाली दिवसभर भिक्खू संघाने धम्मदेसना दिली. यावेळी देखील शहरातील उपासक-उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जनगणनेत पाली भाषेचा उल्लेख करावा

नागसेनवन येथील बोधीवृक्षाखाली धम्मदेसनेत भन्ते धम्मज्योती यांनी उपदेश केला की, ज्या भाषेत बौद्धधम्माचे सर्व साहित्य उपलब्ध आहे. ती भाषा अवगत झाली, तरच आपणास तथागतांचे विचार समजू शकतील व बुद्धांच्या विचाराचे अनुकरण करता येईल. जेव्हा केव्हा जनगणना होईल, तेव्हा पाली भाषा अवगत असल्याचे नमूद करा तेव्हाच सरकार दरबारी या भाषेच्या संवर्धनाचा विचार होऊ शकतो. वर्षावासाच्या काळात पाली भाषा शिकण्यासाठी ऑनलाईन तासिका घेतली जाणार आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
सिद्धार्थ उद्यानात बुद्धांचा जयघोष

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सकाळी ९.३० वाजता क्रांती चौक येथून बुद्ध मूर्तीची मिरवणूक निघाली. ती पैठणगेट, औरंगपुरा, भडकलगेटमार्गे सिद्धार्थ उद्यानात पोहोचली. या मिरवणुकीत अशोक कांबळे बौद्ध, डी. एल. अंभोरे, विठ्ठल तुपसागर, प्रमोद पवार, डी.आर. सरदार, एम. एम. ढगे, रमेश बनसोडे, डी. व्ही. थोरात आदींसह उपासक- उपासिका, श्रामणेर संघ, भिक्खू संघ मोठ्या संख्येने सहभागी होता. उद्यानात बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे यांनी पंचशील ध्वजारोहण केले. भिक्खू संघाने बुद्धवंदना घेतली. समता सैनिक दलाचे कॅप्टन विलास पठारे यांच्या नेतृत्वाखली मानवंदना देण्यात आली. तिथे दिवसभर धम्मदेसना, खिरदान, भोजनदानाचा कार्यक्रम चालला.

Web Title: No War, Want Buddha: Pali language conservation resolution on the occasion of Buddha's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.