नोटाबंदीचे शुक्लकाष्ठ शेतकऱ्यांची पाठ सोडेना!

By Admin | Published: March 31, 2017 12:16 AM2017-03-31T00:16:33+5:302017-03-31T00:17:17+5:30

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेत रबी विम्याची रक्कम जमा झाली

Noda shubhakarakera farmers' sada shedana! | नोटाबंदीचे शुक्लकाष्ठ शेतकऱ्यांची पाठ सोडेना!

नोटाबंदीचे शुक्लकाष्ठ शेतकऱ्यांची पाठ सोडेना!

googlenewsNext

जालना : जिल्हा मध्यवर्ती बँकेत रबी विम्याची रक्कम जमा झाली असून, सुमारे ४३ कोटी रूपयांचे वाटप करताना जिल्हा मध्यवर्ती बँकेवर नोटाबंदीचे संकट गहिरेच राहण्याचा अंदाज आहे. कोट्यवधी रूपये वाटप करण्यासाठी नोटा मिळतात की नाही याबाबत अधिकाऱ्यांनीच साशंकता व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील ४ लाख ९६ हजार ७१२ शेतकऱ्यांनी २०१५ या वर्षात ६ कोटी १८ लाख २७ हजार २४४ एवढा रबी विमा भरला होता. यातून शेतकऱ्यांना ४३ कोटी १२ लाख ९५ हजार २२७ एवढा विमा मंजूर झाला आहे. २०१५-१६ हंगामातील रबी पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मुख्य कार्यालयाकडून बँकेत वर्ग करण्यात आली आहे. मात्र मध्यवर्ती बँकेची करन्सी चेस्ट असलेल्या बँका एवढी रक्कम कधी व कशी देणार हा मोठा प्रश्न बँक अधिकारी उपस्थित करीत आहेत. एवढ्या रक्कमेसाठी बँकेला दररोज पाच लाख रूपयांची रक्कम अपेक्षित आहे. पाच लाख रूपये मिळाल्यास शेतकऱ्यांना कमी जास्त करून रक्कम वितरित करण्यात येईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर व्यवस्थापक डब्ल्यू.एस. कदम म्हणाले, पीक विमा वाटप करण्याचे आदेश बँकेला प्राप्त झाले आहेत. मार्चएंडची कामे उरकल्यावर विमा वाटप करण्यात येणार आहे. मात्र यासाठी नोटांचा तुटवडा भासू शकतो. दिवसाकाठी सुमारे पाच लाखांचे चलन लागेल. ६४ शाखेत एकाच वेळी गर्दी होणार असल्याने नोटांची टंचाई जाणवू शकते असा अंदाज कदम यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Noda shubhakarakera farmers' sada shedana!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.