वृक्षलागवड मोहिमेसाठी नोडल अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:05 AM2021-05-29T04:05:46+5:302021-05-29T04:05:46+5:30
औरंगाबाद : वृक्षलागवड मोहीम ५ जून रोजी राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागस्तरावर ...
औरंगाबाद : वृक्षलागवड मोहीम ५ जून रोजी राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागस्तरावर रोहयो उपायुक्त, जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी, पंचायत समिती, गावस्तरावर प्रत्येक साधारण ५ ते ६ गावांच्या समूहासाठी तालुक्यातील विविध शासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार नियुक्त करतील.
रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण करा
औरंगाबाद : सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण करावीत, अशा सूचना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यंत्रणेला दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विविध विषयांवर बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदी योजनेंतर्गत रस्त्यांची कामे ही नियोजनबद्ध पद्धतीने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.