महामार्गावर फलक लावल्याप्रकरणी न. प. विरोधात पोलिसांत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:04 AM2021-05-21T04:04:07+5:302021-05-21T04:04:07+5:30
सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग कन्नड येथून गेला आहे. या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाने दिशादर्शक फलक लावणे आवश्यक होते. मात्र, ...
सोलापूर धुळे हा राष्ट्रीय महामार्ग कन्नड येथून गेला आहे. या ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाने दिशादर्शक फलक लावणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तो लावलेला नाही. दिशादर्शक फलक नसल्याने येथे बारा अपघात झालेले आहे. यामुळे कन्नड न. प. ने महामार्गावर वेलकम कन्नड हा फलक लावला. याचे नागरिकांनी स्वागत केले. मात्र, महामार्ग प्राधिकरणाने फलक लावला म्हणून न. प. च्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यामुळे खळबळ उडाली असून, न.प.च्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
चौकट -
तर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवरही मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा
महामार्गावर दिशादर्शक फलक न लावल्याने आतापर्यंत बारा अपघात झालेले आहेत. न.प. ने लावलेला बोर्ड गुन्हा वाटत असेल तर आमच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच हा फलक पोलीस ठाण्यात जमा करून घ्यावा. याचसोबत अपघात होऊन लोक मृत झालेले आहेत, त्याप्रकरणी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, अशा आशयाचे निवेदन न. प. गटनेते संतोष कोल्हे आणि नगराध्यक्षा स्वाती कोल्हे यांनी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रेंगे यांना दिले आहे.
फोटो : कन्नड नगरपरिषदेने लावलेला हाच तो दिशादर्शक फलक महामार्ग प्राधिकरणाने गुरुवारी दुपारी हटविला.
200521\1621519288022_1.jpg
कन्नड नगरपरिषदेने लावलेला हाच तो दिशादर्शक फलक महामार्ग प्राधिकरणाने गुरूवारी दुपारी हटविला.