दीडशे नव्हे, शंभर कोटींच्याच रस्ते निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 01:08 AM2017-09-15T01:08:46+5:302017-09-15T01:08:46+5:30

महापालिकेला मंजूर केलेल्या १०० कोटीतून ३१ रस्त्यांची कामे करण्यास शासनाने तांत्रिक मान्यता दिली आहे., मनपा प्रशासन फक्त १०० कोटींच्याच निविदा काढणार आहे.

 Not one hundred and fifty crores roads, only tender | दीडशे नव्हे, शंभर कोटींच्याच रस्ते निविदा

दीडशे नव्हे, शंभर कोटींच्याच रस्ते निविदा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेला मंजूर केलेल्या १०० कोटीतून ३१ रस्त्यांची कामे करण्यास शासनाने तांत्रिक मान्यता दिली आहे., मनपा प्रशासन फक्त १०० कोटींच्याच निविदा काढणार आहे. डिफर पेमेंटमधून करण्यात येणाºया ५० कोटींच्या कामांबद्दल काहीच निर्णय झाला नसल्याचा खुलासा शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. प्रशासनाचा हा खुलासा ऐकून एमआयएम सदस्य सर्वांत जास्त अवाक् झाले होते.
महापौर बापू घडमोडे यांनी शासन निधीतून १०० कोटींचे रस्ते आणि ५० कोटींत डिफर पेमेंटच्या पद्धतीने रस्ता तयार करण्याची घोषणा केली. शासनाने फक्त १०० कोटींच्या ३१ रस्त्यांना मान्यता दिली. उर्वरित १९ रस्त्यांची कामे डिफर पेमेंटमध्ये करण्याचे आश्वासन ाहापौरांनी एआयएमच्या शिष्टमंडळाला दिले होते. जुन्या शहरातील काही रस्ते डिफर पेमेंटमध्ये होतील या आशेवर एमआयएम नगरसेवक होते. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवक राजू वैद्य, राज वानखेडे यांनी १०० कोटींच्या निविदांचा मुद्दा उपस्थित केला. शहर अभियंता पानझडे यांनी सांगितले की, शासनाने जेवढा निधी मंजूर केला तेवढ्याच रस्त्यांच्या निविदा काढण्यात येतील. त्यासाठी नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. निविदा एक काढावी का; ३१ रस्त्यांच्या कामानुसार यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. ५० कोटींच्या डिफर पेमेंटवरही कोणताच निर्णय नसल्याचे त्यांनी नमूद केले. किराडपुरा राममंदिर ते मनपा आणि दमडी महल ते कटकटगेट मार्गे पोलीस मेसपर्यंतचा रस्ता त्यात नाही का, अशी स्पष्ट विचारणा एमआयएम नगरसेवक शेख अजीम, सय्यद मतीन यांनी केली. पानझडे यांनी स्पष्ट शब्दांत असा कोणताही रस्ता यादीत नसल्याचे नमूद केले. महापौरांनी तर आम्हाला आश्वासन दिले होते असा युक्तिवादही त्यांनी केर्ला मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.१०० कोटींच्या निविदा काढण्यापूर्वी संपूर्ण नियमावली स्थायी समितीसमोर ठेवण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक राजू वैद्य यांनी केली. सभापती बारवाल यांनीही प्रशासनाला त्यासंदर्भात सूचना दिल्या. शहर अभियंता पानझडे यांनी नियमावली तयार करून स्थायीसमोर ठेवण्याचे आश्वासन दिले.

Web Title:  Not one hundred and fifty crores roads, only tender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.