वयोवृद्ध नाही तर लहान मुलांनाही मोतीबिंदू होतो; कारण काय?

By संतोष हिरेमठ | Published: January 14, 2024 11:15 AM2024-01-14T11:15:23+5:302024-01-14T11:20:02+5:30

गदी एक दिवसाच्या बाळाला व त्यापेक्षा मोठ्या मुलांनादेखील मोतीबिंदूचा धोका असतो.

Not only the elderly, but children also get cataracts; What is the reason? | वयोवृद्ध नाही तर लहान मुलांनाही मोतीबिंदू होतो; कारण काय?

वयोवृद्ध नाही तर लहान मुलांनाही मोतीबिंदू होतो; कारण काय?

छत्रपती संभाजीनगर : मोतीबिंदू म्हटले की म्हातारपणीच होणारा आजार, असा अनेकांचा समज आहे. परंतु अगदी एक दिवसाच्या बाळाला व त्यापेक्षा मोठ्या मुलांनादेखील मोतीबिंदूचा धोका असतो. त्यामागे अनेक कारणे आहेत. परंतु मुलाला मोतीबिंदू आहे, म्हणून पालकांनी घाबरून जाता कामा नये. वेळीच उपचार घेतल्यास मुलांची दृष्टी सुरक्षित राहते, असे नेत्रतज्ज्ञ म्हणाले.

मोतीबिंदू म्हणजे काय?
मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग (लेन्स) धुरकट होणे, पांढरे पडणे होय. उत्तम दृष्टीसाठी नैसर्गिक भिंग पूर्णतः पारदर्शक असणे आवश्यक असते. या लेन्सची पारदर्शकता मोतीबिंदूमध्ये कमी होते आणि रुग्णास अंधूक दिसू लागते.

कारणे काय?
प्रामुख्याने वयोमानामुळे मोतीबिंदू होतो. त्याबरोबरच मधुमेह, डोळ्यांवर अतिनील किरणांचा मारा, डोळ्यांना जखम, अधिक काळ सूज राहणे, आनुवंशिकता आदींमुळे मोतीबिंदू होऊ शकतो.

लक्षणे काय?
रात्री वाहन चालवताना समोरून येणारा प्रकाश डोळ्यांसमोर पसरल्यासारखा (ग्लेअर वा धूसरपणा) वाटणे, चष्म्याचा नंबर सतत बदलणे, दृष्टीवर परिणाम आदी लक्षणे आहेत.

मुलांनाही मोतीबिंदू का होतो?
मोतीबिंदू हा फक्त ज्येष्ठांनाच होणारा आजार नाही, तर लहान मुलांनाही मोतीबिंदू होऊ शकतो. जन्मजातच अनेक मुलांमध्ये मोतीबिंदू आढळतो. पालकांकडून त्यांच्या मुलांमध्ये मोतीबिंदू येऊ शकतो. म्हणजे मोतीबिंदू हा आनुवंशिक कारणामुळेही होऊ शकताे. जन्मजात मोतीबिंदूची अनेक कारणे असू शकतात. ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता, गरोदरपणात आईला रुबेलाची लागण होणे आदी बाबी त्यासाठी कारणीभूत ठरतात.

घाटीत आठवड्याला १५ बालके
घाटीतील नेत्ररोग विभागाच्या प्राध्यापिका डाॅ. वैशाली उणे-लोखंडे म्हणाल्या, आठवड्यातील दोन दिवसांच्या ओपीडीत मोतीबिंदू असलेली किमान १५ ते २० मुले येतात. घाटीत मुलांमधील मोतीबिंदूसह तिरळेपणा आणि इतर दृष्टीदोषावर उपचार होतात.

१० हजार मुलांमागे दोघांना मोतीबिंदू
साधारपणे १० हजार मुलांमागे दोघांना मोतीबिंदू आढळतो. काहींना जन्मजात असतो. तर काहींना जन्मानंतर होतो. त्यामागे अनेक कारणे आहेत. लहान मुलांच्या मोतीबिंदूवर शहरात उपचार उपलब्ध आहेत.
- डाॅ. मनोज सासवडे, नेत्ररोगतज्ज्ञ

Web Title: Not only the elderly, but children also get cataracts; What is the reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.